सरकारला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 02:14 PM2023-09-10T14:14:07+5:302023-09-10T14:27:59+5:30

कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा 'कलंक' सरकारला पुसता येणार नाही, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे. 

The stigma of farmer suicide on the government cannot be erased; Attack of Jayant Patil | सरकारला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल

सरकारला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा 'कलंक' सरकारला पुसता येणार नाही, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे. 

एका बातमीचा आधार घेत शेतकरी आत्महत्येबद्दल  ट्विटरवर आपले मत व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, "एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल ८६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. दिवसाला सरासरी २ ते ३ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे", अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

याचबरोबर, "कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे," अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, यंदा राज्यात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. अनेक गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी पिके शेतातच जळून गेलीत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Web Title: The stigma of farmer suicide on the government cannot be erased; Attack of Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.