कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:48 PM2023-08-04T14:48:51+5:302023-08-04T14:49:15+5:30

शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

The story of when a poet becomes an MLA | कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

googlenewsNext

नकवी ना. धों. महानोर यांची विधान परिषदेतील १२ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक भाषणे ही कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक होती. कृषीविषयक  धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महानोर यांचे विचार राज्य सरकारसाठी दिशादर्शक ठरले. शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेविषयी ते म्हणाले होते, की या विषयावर तेच ते बोलण्याचा मला कंटाळा आला आहे. तेच ते आणि तेच ते ही विंदा करंदीकरांची कविता मला आठवते. राज्यकर्त्यांच्या संवेदना गोठून गेल्या आहेत असे वाटते.  तेच ते पाणी, तेच ते राज्य, मंत्रीही तेच ते असे सगळे चालले आहे. 

सत्ता, मुख्यमंत्री बदलले की आपली कृषिविषयक धोरणे बदलतात असे होऊ नये. दहा वर्षे एकात्मिक कार्यक्रम कोणताही बदल न करता राबविला तर सात वर्षांतच त्याची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकेल. ज्या गावचे मजूर, त्याच गावची माती, त्याच गावचे पाणी, त्याच गावची झाडे यानुसार सारे उभे केले पाहिजे.   

महानोर यांच्या भाषणांतून...
- वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पाणी अडवा पाणी जिरवा, असे त्यांनी सांगितले होते. पाणी अडवा बदलले, जलसंधारण हे नाव आले, माणसे बदलली, नावे बदलली; पण शेतकऱ्यांचे नशीब नाही बदलले. 

- इस्राइलसारखे देश स्वत:च्या दु:खाची भैरवी गात बसले नाहीत. देशाविषयीचा एकसंधपणा त्यांच्याकडे आहे;  आपण त्यात आणि नियोजनात कमी पडतो. इस्राइल, जर्मनी, जपानचे शास्त्र व तंत्रज्ञान आपण शेतीत वापरत नाही तोवर इथे चर्चा करून काहीही होणार नाही. इस्राइलचे पाणी वाटपाचे तंत्र आपण वापरले तर तिप्पट पाणी मिळेल. 

- उसासाठी शेतीला वारेमाप पाणी दिले जाते. हे तर असे आहे की श्रीमंत माणसाला डायबिटीस झाला आहे आणि कोरडवाहू शेतकरी जगू शकत नाही. हा बागायती आणि कोरडवाहू शेतीतील फरक आहे.  
 

Web Title: The story of when a poet becomes an MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.