Supreme Court: ठाकरेंकडील शिवसेनेच्या मालमत्ता शिंदेंना द्याव्या, मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 10:39 PM2023-04-28T22:39:20+5:302023-04-28T22:40:35+5:30
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाकडील सर्व संपत्ती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. यातच ठाकरे गटाकडे असलेल्या शिवसेनेच्या सर्व मालमत्ता शिंदे गटाला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती. यामध्ये शिवसेना भवनासह, महाराष्ट्रभरातील शाखा कार्यालये आणि पक्षाच्या फंडासह मालमत्तांचा समावेश होता.
वकील आशिष गिरी या वकिलाने ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीवाई चंद्रचूड़ यांनी याचिकादार वकिलाला ही कोणत्या प्रकारची याचिका आहे असा सवाल करत तुम्ही कोण असे विचारले. तुमच्या याचिकेवर विचार केला जाऊ शकत नाही, असे चंद्रचूड यांनी म्हटले.