चिन्ह गोठवण्याला ठाकरे गटच जबाबदार; दीपक केसरकर यांचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:26 AM2022-10-10T06:26:39+5:302022-10-10T06:27:09+5:30
निवडणूक आयोगाने यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनीरसेल्वम यांच्याबाबतीत असा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले याला उद्धव ठाकरे गटच जबाबदार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. आयोगाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. आमच्याबरोबर आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने धनुष्यबाण चिन्हावर आमचाच अधिकार असल्याचा दावाही केसरकर यांनी केला.
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दु:ख झाल्याचे जे सांगत आहेत, तेच या निर्णयाला जबाबदार आहेत. आम्ही वेळेवर कागदपत्रे दाखल केली असताना त्यांनी वेळोवेळी तारखा मागितल्या. त्यामुळेच आयोगाने हा निर्णय दिल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनीरसेल्वम यांच्याबाबतीत असा निर्णय घेतला आहे. आमचे बाळासाहेबांवर प्रेम आहे, त्यामुळे आमचे धनुष्यबाणावर प्रेम आहे, असेही ते म्हणाले.