जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:54 PM2022-12-01T16:54:43+5:302022-12-01T16:55:05+5:30

महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती अशी ओळख आहे. तुम्ही वेगळी ओळख करायला जाता आणि घोटाळा होतो असं जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना सुनावलं.

The truth that should be brought before the people, Jitendra Awhad's counter attack on Raj Thackeray | जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार

जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार

googlenewsNext

ठाणे - जातपात, धर्म कुठल्या पॅरामिटरमध्ये मोजले जातात हेच कळत नाही. शिवाजी महाराजांबद्दल पहिलं आक्षेपार्ह लिखाण २००३ मध्ये आले. जेम्स लेननं महाराजांच्या पितृत्त्वावर शंका घेतली. त्यावर आम्ही बोलायचं नाही का? तुम्ही जाऊन ज्यांनी ही माहिती दिली होती त्यांची माफी मागितली होती. त्यांनी आमच्या महाराजांची बदनामी करायची आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात असं सांगत जितेंद्र आव्हाडांनीराज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी मराठा नाही, मागासवर्गीय आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राची ओळख आहे. पुरंदरे हे कांदबरीकार आहेत इतिहासकार नाही असं आम्ही बोललो त्यांच्याबाजूने तुम्ही बोलला. हर हर महादेव सिनेमातील दृश्यावर आक्षेप घेतला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर पाणी टाकलं. बाजीप्रभू देशपांडे हे महाराजांच्या तुलनेत होते. त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला दाखवलं. तुम्ही या सिनेमाला पाठिंबा दिला. मग कोण करतंय जातीपातीचं राजकारण? जे सत्य आहे ते लोकांसमोर आणले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुम्ही ज्या चित्रपटावर डोक्यावर घेतलं त्याला राज्यातील जनतेने नाकारलं. पूर्वीची लोक इतिहास वाचत नव्हती. कारण त्यांना शाळेतच जाऊ दिले जात नव्हते. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा साठेंना शाळेत बसू दिले नव्हते. राज्यातील ९० टक्के बहुजन समाजाची दुसरी पिढी आता शिकतेय. त्यांना आधीचा इतिहास माहिती नव्हता. छत्रपतींचा विचार हाच शाहू, फुले आंबेडकर विचार आहे. कर्मकांडाला छत्रपतींनी थारा दिली नाही. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर आलेला विचार शाहू, फुले आंबेडकरांनी समाजात नेला. महिलांची शाळा, अस्पृशांचा लढा, शिक्षण हे समोर आले. म्हणून चवदार तळ्याचं आंदोलन महाडला का घेतले कारण समोर रायगड आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती अशी ओळख आहे. तुम्ही वेगळी ओळख करायला जाता आणि घोटाळा होतो. जेम्स लेनला पाठिंबा देऊन वाद कुणी निर्माण केला? जातीपातीचं राजकारण बोलण्यापुरतं असते. पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहिला हे आजही बोलतो. बहुजनांना शाळा नव्हती. त्यांनी इतिहास वाचला नव्हता. महाराष्ट्रातला बहुजन ८० टक्के आहे. तुमचा जातीवाद पाहा असंही राज ठाकरेंना आव्हाडांनी बजावलं. 

आम्हीही सिनेमा काढणार आहोत
जेम्स लेनच्या पुस्तकात ज्यांची नावे होती त्यांनी जबाबदारी होती. छत्रपतींबाबत चुकीचं छापून न येणे, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चूक पसरवणे योग्य नाही. ते महान देशपांडे जे आहेत त्यांनी पुरावे घेऊन यावेत. आम्हीही चित्रपट बनवतोय. त्यावर जयसिंग पवार, इंद्रजित सावंत यांच्याकडून तपासून शिक्का घेणार आहोत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: The truth that should be brought before the people, Jitendra Awhad's counter attack on Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.