रंगभूमीमुळे मिळाली आयुष्याला योग्य दिशा

By admin | Published: January 13, 2017 02:39 AM2017-01-13T02:39:20+5:302017-01-13T02:39:20+5:30

विनोदी किस्से, अभिनय प्रवास आणि मराठवाडी बोलीच्या सहज संवादातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित

Theater has got the right direction for life | रंगभूमीमुळे मिळाली आयुष्याला योग्य दिशा

रंगभूमीमुळे मिळाली आयुष्याला योग्य दिशा

Next

भोसरी : विनोदी किस्से, अभिनय प्रवास आणि मराठवाडी बोलीच्या सहज संवादातून अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. या वेळी बोलताना हौशी रंगभूमीने आईसारखे प्रेम दिले. त्यामुळेच आयुष्याला योग्य दिशा मिळाली, असे प्रतिपादन केले.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालिकेतील दुसरे पुष्प अनासपुरे यांची प्रकट मुलाखत घेऊन गुंफण्यात आले. या वेळी अनासपुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. विश्वनाथ कोरडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे, विक्रांत लांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास माजी महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक संजय वाबळे, शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे, नगरसेवक माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ चित्रपटात शेतकऱ्याची भूमिका साकारली. तेव्हापासून शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रमाण पाहता आपण एकटे मदत करण्यासाठी पुरणार नाही, याची जाणीव झाल्याने ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना केली. या उपक्रमांतर्गत १४०० शिवण यंत्रे, ३०० मुलींना सायकलचे वाटप, १५० शेतकऱ्यांना शेळ्या, तर २२०० कुटुंबांना प्रत्येकी १५ हजारांची मदत केली. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी गावांसाठी कार्य करेल, एकीकडे चित्रपटसृष्टीतील झगमगाट नि दुसरीकडे पांढरं कपाळ घेऊन, अनाथ लेकरू कंबरेवर घेऊन मदत स्वीकारणारी जेमतेम विशीतली विधवा. एक माणूस म्हणून आपण काय करू शकतो याची जाणिव नाम फौउंडेशन झाली असे यावेळी अनासपुरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
या वेळी मकरंद अनासपुरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरे दिली व आपल्या खास ग्रामीण शैलीत उत्तरांची व विनोदांची सरबत्ती केली. या वेळी प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. मुलाखतीत अनासपुरे म्हणाले की, माझी अभिनयाची सुरुवात चौथ्या वर्गापासून झाली. अभिनेता होण्याकरिता १२ वर्षे लागली. या काळात नाना पाटेकरांच्या मदतीने मला खूप आधार मिळाला. अभिनयाची कामे मागताना घडलेले मजेशीर किस्से त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Theater has got the right direction for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.