शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी

By admin | Published: April 29, 2017 02:31 AM2017-04-29T02:31:35+5:302017-04-29T02:31:35+5:30

पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Theft of the statue of the martyr Jawan | शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी

शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी

Next

सुपा (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते व तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये शत्रूचा सामना करीत असताना १९ आॅगस्ट २००३ रोजी अरुण कुटे हा लष्करी जवान शहीद झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ९० हजार रुपये किमतीचा ब्राँझ धातूचा पुतळा करून १ डिसेंबर २०११ रोजी अण्णा हजारे यांच्या हस्ते तो बसवण्यात आला होता. या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आलेले असून पारनेर-विसापूर मार्गालगत हे ठिकाण आहे़ अशा वर्दळीच्या ठिकाणाहून गुरुवारी रात्री चोरट्यांनी पुतळा चोरून नेला़ याबाबत सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Theft of the statue of the martyr Jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.