...तर रामलीला मैदानावर आंदोलन
By Admin | Published: July 25, 2016 05:13 AM2016-07-25T05:13:40+5:302016-07-25T05:13:40+5:30
शासनाने लोकपाल कायदा मंजूर केला पण, त्याची अंमलबजावणी मात्र अजून केलेली नाही़ कायद्याची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल
पुणे : शासनाने लोकपाल कायदा मंजूर केला पण, त्याची अंमलबजावणी मात्र अजून केलेली नाही़ कायद्याची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा रामलीला मैदानावर बसावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़
पुण्यात एका पुस्तक प्रकाशनासाठी आले असताना ते म्हणाले, लोकपाल कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही़ या संदर्भात शासनाला आपण पत्र लिहिले आहे़ त्यांचे उत्तर पाहू, करू असे आहे़ शेवटी संघर्षाला पर्याय नाही़ एकनाथ खडसे यांच्या एमआयडीसीतील जागेबाबत ते म्हणाले, एका व्यक्तीची चौकशी समिती नेमून उपयोग नाही़ चौकशी आयोग नेमला पाहिजे़ चौकशी आयोगाला कायद्याचा आधार असतो़ कोपर्डी घटनेविषयी ते म्हणाले, आम्ही ग्रामसुरक्षा दल कायद्याची मागणी केली आहे़ त्यात गावातील महिलांचाही समावेश आहे़ या दलाला अधिकार नसेल, पण गावात अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती ते पोलिसांना देतील, त्यावर कारवाई करावी लागेल़ कारवाईन केल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील़ (प्रतिनिधी)