...तर भारताचा इतिहास वेगळा असता

By admin | Published: May 23, 2016 02:09 AM2016-05-23T02:09:48+5:302016-05-23T02:09:48+5:30

पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़

... then the history of India would be different | ...तर भारताचा इतिहास वेगळा असता

...तर भारताचा इतिहास वेगळा असता

Next

पुणे : पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़ त्यातून भारताचा इतिहास वेगळा राहिला असता, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले़
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय विचार साधना प्रकाशन आणि नागपूर येथील विवस्वान प्रकाशनातर्फे डॉ. कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘कारुण्यऋषी पं. दीनदयाल उपाध्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन घैसास, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, किशोर शशितल आदी उपस्थित होते.
भांडारी म्हणाले, ‘शोषित वंचितांची भाषा करणाऱ्यांनाच हा वर्र्ग हवा असतो. शोषित वर्गाचा उद्धार व्हावा, असे त्यांना कधीच वाटत नाही. कारण या वर्गावरच त्यांचे राजकारण सुरू असते. त्यामुळेच मोदी सरकारने जन-धन योजना राबवून समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांत या वर्गातील ३२ कोटी नागरिकांनी शून्य रुपये असलेले खाते काढले. या खात्यांवर आता ६५ हजार कोटींच्या ठेवी आहेत. याचाच अर्थ पंडितजींनी सांगितलेल्या मार्गाने मोदी सरकार काम करत आहे.’
६० - ६५ वर्षे देशात समाजवादी विचारांची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अर्र्थव्यवस्थेमुळे १२५ कोटींच्या देशात आजही २६ टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था आर्थिक दरी निर्माण करत आहे. पंडितजींनी त्यांच्या काळात साम्यवादी, समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असताना आपला स्वत:चा वेगळा विचार मांडला होता. लोककल्याणकारी योजनांच्या नावाखाली अनुदाने आणि योजना देऊन दारिद्र्य निर्मूलन होत नसल्याचे पंडितजींचे मत होते. भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या वेळी पक्षाने पंडितजींचे विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: ... then the history of India would be different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.