...तर राजकारणातून निवृत्ती घेईन; मदन भोसलेंचं थेट आमदार मकरंद पाटलांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:33 PM2021-09-29T18:33:58+5:302021-09-29T18:35:35+5:30

किसन वीर कारखान्यावर विरोधकांकडून होणारे आरोप धादांत खोटे, मदन भोसलेंचं स्पष्टीकरण

Then I will retire from politics; Madan Bhosale challenge to MLA Makrand Patil | ...तर राजकारणातून निवृत्ती घेईन; मदन भोसलेंचं थेट आमदार मकरंद पाटलांना चॅलेंज

...तर राजकारणातून निवृत्ती घेईन; मदन भोसलेंचं थेट आमदार मकरंद पाटलांना चॅलेंज

googlenewsNext
ठळक मुद्देकारखान्याची निवडणूक घेऊन तो कारखाना आपल्या ताब्यात मिळत नाही म्हटल्यावर या मंडळींनी कारखान्याची बदनामी सुरू केलीसरकार त्यांचे असल्यामुळे चौकशीचा ससेमिरा आमच्याभोवती फिरवला जातोय१५ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ आणि कारखान्याला गाळप परवाना मिळवू

सातारा : ‘प्रतापगड कारखाना खासगी तत्त्वावर चालवायला घ्यायचा होता, ते जमलं नाही, खंडाळा कारखाना उभा राहू नये म्हणून अडचणी आणल्या, त्या यशस्वी झाल्या नाहीत अन् किसन वीर कारखान्यात झालेले सलग तीन पराभव पचनी पडले नाहीत, त्यामुळे विद्यमान आमदार, त्यांचे बंधू व बगलबच्चे बेछूट आरोप करत आहेत. कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज असल्याचा डांगोरा ते पिटत आहेत. परंतु त्याच्यापेक्षा निम्मे जरी कर्ज असेल, तरी मी राजकारणातून निवृत्ती घेईन’ असं स्पष्टीकरण किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.

मदन भोसले म्हणाले, ‘६ तालुक्यांतील ५४० गावांमध्ये किसन वीर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. ५२ हजार शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून मी निर्णय घेतलेले आहेत. ‘किसन वीर’ माझ्याकडे चालवायला आला, तेव्हा कारखान्यावर १ लाख ६९ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. तरी देखील अतिशय कार्यक्षमपणे आम्ही कारखाना चालवला. कारखान्यावर मोठमोठे प्रकल्प उभे करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली. प्रतापगड सहकारी साखर कारखाना अडचणीत आला असताना, शरद पवार यांच्या सूचनेखातर हा कारखाना चालवायला घेतला. कारखान्याची अवस्था अतिशय प्रतिकूल होती, तरीदेखील तो शेतकऱ्यांचा राहावा, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तो कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला. दुष्काळी भागातील खंडाळा कारखाना देखील शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना हवा, हे जाणून या कारखान्यात देखील आर्थिक गुंतवणूक केली. हे सर्व करत असताना माझा हेतू स्वच्छ होता. माझ्या मनात कोणतेही काळेबेरे कधीच नव्हते. ’मदन भोसले यांनी आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला.

कारखान्याची निवडणूक घेऊन तो कारखाना आपल्या ताब्यात मिळत नाही म्हटल्यावर या मंडळींनी कारखान्याची बदनामी सुरू केली. कारखाना चालावा म्हणून २८ हजार हेक्टरवर उसाची लागवड केली. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे कर्ज उचलण्यात आले होते. मात्र या कर्ज प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना कोर्टात जायला त्यांनी भाग पाडले. त्यातूनही आमचे संचालक मंडळ तावून-सुलाखून बाहेर पडले. निर्दोष मुक्तता झाली. माझ्यावरील वैयक्तिक द्वेषापोटी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम आमदार व त्यांचे सहकारी करत आहेत. आमदारांनी विधानसभेत कर्तबगारी दाखवावी. तिथे काही दाखवता येत नाही म्हणून आमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. सरकार त्यांचे असल्यामुळे चौकशीचा ससेमिरा आमच्याभोवती फिरवला जातोय. यातून विरोधकांना काहीही साध्य करता येणार नाही. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून आम्ही कारखाना चालवतोय. १५ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ आणि कारखान्याला गाळप परवाना मिळवू, असा विश्वास देखील मदन भोसले यांनी व्यक्त केला.

मदन भोसले म्हणतात...

- किसन वीर कारखान्यावर ३२५ कोटी रुपयांचे कर्ज

- प्रतापगड कारखान्यामध्ये ६६ कोटी रुपयांची गुंतवणूक

- खंडाळा सहकारी साखर कारखान्यामध्ये १२० कोटी रुपयांची गुंतवणूक

- बारा वर्षांमध्ये तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक

- गत हंगामातील एफआरपीपोटी शेतकऱ्यांना ५६ कोटी दिले

- उरलेले ४९ कोटी १५ ऑक्टोबरपर्यंत देणार

- किसन वीर कारखान्यावर ५१२ कोटींचे नवे प्रकल्प उभारले

- ७५० कामगार होते, आजच्या घडीला १ हजार २५० कामगार आहेत.

‘प्रतापगड’च्या व्यवस्थापनाने आडमुठेपणा केला

प्रतापगड कारखाना किसन वीरने आठ वर्षांपासून भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. या कारखान्यामध्ये किसन वीरची मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे गेल्यावर्षी कारखाना बंद राहिला. आता कारखान्याचे व्यवस्थापन लवादासमोर गेले आहे. साखर आयुक्तांसमोर दोन्ही बाजू मांडून झाल्या आहेत.

Web Title: Then I will retire from politics; Madan Bhosale challenge to MLA Makrand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.