...तर हॉटेल्सची तक्रार नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2017 04:14 AM2017-01-10T04:14:55+5:302017-01-10T04:14:55+5:30
अनेकदा हॉटेलमध्ये ग्राहकांना चांगल्या प्रतिची सेवा मिळत नाही. पण, तरीही बिलाच्या किंमतीवर सर्व्हिस चार्ज आकारला जातो. हे चुकीचे आहे.
मुंबई : अनेकदा हॉटेलमध्ये ग्राहकांना चांगल्या प्रतिची सेवा मिळत नाही. पण, तरीही बिलाच्या किंमतीवर सर्व्हिस चार्ज आकारला जातो. हे चुकीचे आहे. त्यामुळे केंद्राकडून हॉटेल चालकांनी सर्व्हिस चार्ज आकारू नयेत असे आदेश दिले आहेत. पण, अजूनही आदेशांची पायमल्ली अनेक हॉटेल्समध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा हॉटेल्सविरुद्ध तक्रार करावी असे आवाहन कनझ्युमर गाईड्न्स सोसायटी आॅफ इंडियातर्फे (सीजीएसआय) करण्यात आले आहेत.
२ जानेवारीपासून हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये आकारला जाणारा सर्व्हिस टॅक्स हा ऐच्छिक असावा असे जाहीर केले आहे. ग्राहकांना हॉटेलची सेवा आवडत नाही. तरीही बिलात सर्व्हिस चार्ज लावला असल्यामुळे त्यांना तो भरावा लागतो. ग्राहकाला सेवा आवडली नाही तर तो सर्व्हिस चार्ज देणे सहज नाकारू शकतो. ग्राहकांनी आपल्या या हक्काचा वापर केला पाहिजे असे सीजीएसआयचे म्हणणे आहे. सर्व्हिस चार्ज ऐच्छिक असल्यामुळे कोणत्याही ग्राहकाला तो द्यायची इच्छा नसल्यास तो नाकारू शकतो. हॉटेल मालक त्याला बंधनकारक करु शकत नाहीत. त्यामुळे सीजीएसआयशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन सीजीएसआयचे मानद सचिव मनोहर कामत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)