...तर महाविद्यालये सुरु करण्याबाबत होऊ शकतो पुनर्विचार: उदय सामंत यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 02:44 PM2021-02-18T14:44:28+5:302021-02-18T14:51:17+5:30
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना..
पुणे : कोरोना वाढत असेल तर काॅलेज सुरु करण्याबाबत फेरविचार केला जाउ शकतो असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. 'लोकमत'ला दिलेल्या 'Exclusive' मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेउन जिल्हाधिकारी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थांना उपस्थिती सक्तीची करु नये असेही ते म्हणाले. “
सामंत म्हणाले, कोरोना गेला आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तसं नाहीये. संख्या वाढते आहे. आणि हे लक्षात घेता आज विद्यापीठांना देखील आमच्या सुचना गेल्या आहेत. जर हे असेच कायम राहिले तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला काही विचार करावा लागेल. काॅलेज उघडण्याबाबत नक्कीच फेरविचार करु शकतो. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अधिकार दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय विद्यापीठांनी उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थी त्यांच्या घरूनच परिक्षा देवु शकतात असेही सामंत यांनी सांगितले.
ऑनलाईन परीक्षांबाबत येणाऱ्या अडचणींसाठी एक समिती नेमली होती. या अडचणी एका महिन्यात त्याचा अहवाल येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ परीक्षांमध्ये काय अडचणी आल्या याबाबत एक समिती नेमली आहे. या समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून सर्व विद्यापिठांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. ते महिनाभरात याबाबतचा देतील. त्यानंतर जर कोण दोषी आढळेल तर त्यांच्यासह कारवाई होईल” असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.