...तर शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षाही भयानक आंदोलन होईल; मराठा आरक्षणावरून तुपकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:40 PM2023-11-03T13:40:14+5:302023-11-03T13:40:54+5:30
शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, या मागणीला मान्य करत जरांगे पाटलांनी काल सायंकाळी उपोषण थांबविले आहे. परंतू, जर दगाफटका झाला तर मराठा समाज सहन करणार नाही, असा इशाराही पाटलांनी दिला आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठा समाजाकडून मुंबईची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असा इशारा दिला आहे.
जरांगे पाटलांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठ्यांना फिरविण्याच काम करू नये. मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठा म्हणजे मरेल पण हटणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात जे दिल्लीत आंदोलन केले, त्यापेक्षाही भयानक आंदोलन राज्यात होईल. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू. असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.