"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:57 AM2024-02-08T11:57:37+5:302024-02-08T11:58:30+5:30

राज ठाकरेंची जी ट्विट, विधाने आहेत. ती सर्व भाजपाच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने राहिलेली आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

"...then we will certainly welcome Raj Thackeray", Rohit Pawar's suggestive statement | "...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान

"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक भाष्य केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही संविधान टिकवण्याच्या भूमिकेसाठी महाआघीडीसोबत येण्यास तयार आहेत. तसेच, येत्या काळात जर मनसे नेते राज ठाकरे आमच्यासोबत आले आणि सर्वच पक्षांना ते मान्य असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करू, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले.

राज ठाकरेंची जी ट्विट, विधाने आहेत. ती सर्व भाजपाच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने राहिलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे हे आपली भूमिका बदलतात का? महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवतात का? हे आपल्याला पहावे लागेल. याशिवाय, राज ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि जनतेबरोबर राहिले तर आम्ही कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून नक्कीच त्यांचे स्वागत करू, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती प्रसारमाध्यांद्वारे काल समोर आली. त्यानुसार, मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीमागील नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आले नाही. मात्र, ही भेट भाजपा आणि मनसे यांच्यातील युतीबद्दल असल्याचे म्हटले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे. याचदरम्यान मनसेने देखील अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. हा व्हिडीओ शेअर करत 'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?, असा सवालही मनसेने उपस्थित केला होता. 
 

Web Title: "...then we will certainly welcome Raj Thackeray", Rohit Pawar's suggestive statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.