...मग महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी का नाही? - अजित पवार

By admin | Published: April 15, 2017 09:40 PM2017-04-15T21:40:52+5:302017-04-15T21:40:52+5:30

त्तरप्रदेश, आंधप्रदेश, तामिळनाडूत कर्जमाफी देऊ शकतात मात्र महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली.

Then why do not farmers' debt relief in Maharashtra? - Ajit Pawar | ...मग महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी का नाही? - अजित पवार

...मग महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी का नाही? - अजित पवार

Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 15 - उत्तरप्रदेश, आंधप्रदेश, तामिळनाडूत कर्जमाफी देऊ शकतात मात्र महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली.
 
लाखांचा पोशिंदा शेतकरी जगला तर सरकार जगेल, असे सांगत हे सरकार बेजबादार असल्याची त्यांनी टीका केली.
मुक्ताईनगरात संघर्ष यात्रा दाखल झाल्यानंतर बोदवड रस्त्यावर मुक्ताई मंदिरात सभा झाली. प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, दिलीप वळसे-पाटील, डॉ. उल्हास पाटील, ज्योत्स्ना विसपुते, जगन सोनवणे यांची भाषणे झाली. 
 
जितेंद्र आव्हाडांचे भाषण सुरू असताना हरताळा येथील शेतकरी रामभाऊ सीताराम महाले यांनी सभेत उभे राहून शासनावर टीकेची झोड उठवली. 
 
(VIDEO : एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर संघर्ष यात्रेकरुंचा नाश्ता)
या सभेपूर्वी विरोधकांनी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर त्यांची भेट घेतली. संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्यात शनिवारी विरोधक जळगावात दाखल झाले होते.
 
यावेळी विरोधकांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगरमध्ये भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी खडसेंच्या फार्म हाऊसवर त्यांची सदिच्छा भेट घेतली. 
 
यावेळी विरोधपक्षातील नेत्यांनी एकनाथ खडसेंसोबत फराळ केला. या राजकीय फराळाची सध्या प्रचंड चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.

Web Title: Then why do not farmers' debt relief in Maharashtra? - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.