‘...तर मग सरकार स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार का?’

By admin | Published: January 6, 2015 02:10 AM2015-01-06T02:10:35+5:302015-01-06T02:10:35+5:30

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असा आग्रह धरणारे देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

'... then will the government take action against itself?' | ‘...तर मग सरकार स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार का?’

‘...तर मग सरकार स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार का?’

Next

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असा आग्रह धरणारे देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मग सरकार स्वत:वर ३०२ चे गुन्हे दाखल करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला.
माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाडा दुष्काळी बैठकीत व नंतर पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार गोंधळले आहे. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशून्य आहे, असा घणाघाती आरोपही या दोघांनी केला. येथील तापडिया नाट्यमंदिरात मराठवाडा दुष्काळी बैठक झाली. येत्या २०-२१ जानेवारीपर्यंत जर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: '... then will the government take action against itself?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.