राज्यात वाढले 21 लाख मतदार
By admin | Published: August 9, 2014 02:31 AM2014-08-09T02:31:42+5:302014-08-09T02:31:42+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली.
Next
यदु जोशी ल्ल मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 8 कोटी 5 लाख इतके मतदार होते. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 9 जूनपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली. तेव्हापासून 31 जुलैर्पयतच्या 53 दिवसांनंतर राज्यातील मतदारांची संख्या वाढून 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 इतकी झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रंनी दिली.
लोकसभा निवडणुकीत उत्साहपूर्ण मतदान झाले होते. या महत्त्वाच्या निवडणुकीत आपण मतदार नव्हतो ही खंत असल्याने आणि आता निदान विधानसभा निवडणुकीत तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करीत असल्याची भावना अनेक मतदारांनी बोलून दाखविल्याचा अनुभव नोंदणी अधिकारी सांगत आहेत. तसेच पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या नवमतदारांमध्येही नोंदणीचा उत्साह दिसून आला. मतदार नोंदणी ही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत सुरू राहणार आहे. आताच जवळपास 21 लाख मतदार वाढले असल्याचे लक्षात घेता ऑक्टोबरच्या मध्यार्पयत एकूण किमान 35 लाख मतदार वाढतील, असा अंदाज आहे. सध्याच्या 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 या मतदारसंख्येवर वयोगटानुसार नजर टाकली तर 18 ते 29 या वयोगटातील तब्बल 3 कोटी 13लाख 8 हजार 514 मतदार आहेत. 35 टक्क्यांहून अधिक मतदार या वयोगटातील आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात या वयोगटाची भूमिका महत्त्वाची असेल. म्हणूनच त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे.
राज्यात 31 जुलैर्पयतची नोंद
वयोगटमतदारसंख्या
18 ते 19 वर्षे 14922243
2क्-2916386271
3क्-392122क्485
4क्-491766क्क्9क्
5क्-59119546क्4
6क्-69 7763479
7क्-7943755क्6
8क् हून अधिक2139148
एकूण82591826