राज्यभरातून ९३७ ग्रंथपालन परीक्षार्थी, सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिकमधून परीक्षेला विद्यार्थीच नाहीत
By admin | Published: June 3, 2017 04:53 PM2017-06-03T16:53:41+5:302017-06-03T16:53:41+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : डी़एड़ समकक्ष समजल्या जाणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेला १ जूनपासून सुरुवात झाली आहे़ राज्यभरातून ९३७ तर सोलापूर जिल्ह्यातून ८९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत़ विशेषत: अहमदनगरमधून सर्वाधिक १०२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत तर दुसरीकडे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य सत्कर्मी लावणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या साताऱ्यासह पाच जिल्ह्यांतून एकही परीक्षार्थी तयार झाला नाही हा विरोधाभास पुढे आला आहे़
डी़एड़ समकक्ष समजल्या जाणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने चालविला जातो़ प्रत्येक जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो़ दहावी उत्तीर्णनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो़ सोलापूर जिल्ह्यातून ८९ जण नव्याने परीक्षा देत आहेत तर ३९ पुनर्परीक्षार्थी आहेत़ सोलापूरमध्ये सिद्धेश्वर कन्या प्रशालेत ७ जूनपर्यंत सात विषयांसाठी ही परीक्षा चालणार आहे़ दोन पर्यवेक्षक या केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत़
--------------------------
जिल्हा आणि परीक्षार्थी
अकोला (६०), अमरावती (२५), बुलढाणा (२५), वाशिम (२८), यवतमाळ (२८), तुळजापूर (३८), औरंगाबाद विभाग (०५), औरंगाबाद (०८), जालना (३२), परभणी (५०), हिंगोली (२५), लातूर (५७), आंबेजोगाई (३६), नांदेड (२०), नागपूर (२९), वर्धा (१५), अहमदनगर (१०२), धुळे (१५), नंदुरबार (३५), जळगाव (२०), कोल्हापूर (१२), सोलापूर (८९), पुणे (३५), इस्लामपूर (१२), ठाणे (५९), कुडाळ (२५), बृहन्मुंबई (८०), रायगड (३३), रत्नागिरी (०८)
----------------------
सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिकमधून विद्यार्थीच नाहीत
यंदा प्रथमच काही जिल्ह्यांच्या बाबतीत ग्रंथपालन परीक्षेबाबत विरोधाभास स्थिती पुढे आली आहे़ सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्ह्यातून परीक्षार्थीच निर्माण झाले नाहीत़ त्यामुळे या जिल्ह्यांनी यंदा परीक्षेसाठी परवानगीच घेतली नाही़ मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आयुष्य सत्कर्मी लावणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जिल्ह्यात परीक्षार्थीच तयार झाले नाहीत़ वर्षभरात दोन-चार विद्यार्थी आले की तेवढ्या कमी विद्यार्थ्यांसाठी तेथे परीक्षा घेतल्या जात नाहीत़ गं्रथालय चळवळीपुढे हा एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे़
--------------------
अत्यंत महत्त्वाचा कोर्स कमी शिक्षण पात्रतेवर, कमी कालावधीचा, थोड्याशा आर्थिक खर्चाचा असून शाळा, महाविद्यालये, वाचनालये यांच्याशी संपर्क ठेवून विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे़ विद्यार्थी न मिळाल्याने वर्गच बंद ठेवणे गैरसोय तर आहेच, वाचन संस्कृ ती आणि ग्रंथालय चळवळीला अप्रत्यक्षरित्या बाधा आणण्याचा प्रयत्न आहे़
- कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र