राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

By admin | Published: October 27, 2016 06:01 PM2016-10-27T18:01:40+5:302016-10-27T18:01:40+5:30

राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

There are eleven crore roads in the state, where? : Ajit Pawar | राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

Next

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २७  : मेक इन इंडियाचा नारा देणारे भाजप सरकार फसवे सरकार आहे़ सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत़ राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, जि प अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी अध्यक्ष बळीराम साठे, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, जि प च्या कृषी समितीचे सभापती आप्पाराव कोरे, महात्मा फुले सूत गिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि. प सदस्य जालिंदर लांडे राष्ट्रवादीचे ता अध्यक्ष प्रकाश चवरे उपाध्वक्ष हेमंत गरड फेडरेशनचे संचालक भारत गुंड माजी सभापती भारत गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, गट नेते प्रमोद डोके नगरसेवक मुस्ताक शेख, तानाजीराजे खताळ, सज्जन पाटील, काकासाहेब भोसले, सतोष वायचळ, आण्णा फडतरे, संतोष सुरवसे, माजी उपसभापती मानाजी माने, महेश पवार, शशीकांत पार्टील, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र व राज्यसरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाला योग्य दर नाही, उद्योग धंदे मोडकळीस आलेले आहेत वेगवेगळ्या योजनाचे अमिश दाखवून सर्व सामान्य जनतेची फसवणुक करणाऱ्या शासनाच्या विरोधात जनतेचा उद्देक झाला तर याला शासन जबाबदार राहील आसा इशारा देत या सरकारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासाठी बांधण्यात आलेल्या उजनी धरणातील पाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना योग्य नियोजन करुन वाटप करत होते परंतू राज्यातील भाजपाचे शासन त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करेल असे वाटत नाही. शासनाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास अडचणीत सापडलेला शेतकरी पून्हा संकटात सापडनारआहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करने हे आमचे कतव्य असुन योग्य नियोजन न केल्यास पाण्याच्या प्रश्नासाठी आपण शेतकऱ्यांबरोब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले़

आरक्षण देणारे सरकार आता गप्प का...
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणणारे सत्तेत आल्या नंतर मात्र चिड़ीचुप बसले आहेत. त्याच प्रमाणे मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला ही सत्ताधाऱ्यांनी बगल दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व दुधाला भाव नाही़ दुष्काळात जनतेला सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तरुणांना हाताला काम नाही़ त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसच सुरक्षित नसतील तर इतर लोकांना संरक्षण कोण देणार? महिलावरील होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे.

Web Title: There are eleven crore roads in the state, where? : Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.