पक्षांतर्गत निवडणुका नकोच

By admin | Published: January 19, 2015 04:48 AM2015-01-19T04:48:06+5:302015-01-19T04:48:06+5:30

काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या

There are no elections within the party | पक्षांतर्गत निवडणुका नकोच

पक्षांतर्गत निवडणुका नकोच

Next

मुंबई : काँग्रेस पक्षाला मजबूत बनवायचे असेल तर पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत ताबडतोब बंद करण्याची गरज असल्याची आग्रही भूमिका मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. निवडणुकीची ही पद्धत बंद करून पूर्वीची नियुक्ती व सक्रिय कार्यकर्त्यांची पद्धत सुरू करण्याची मागणी नेतृत्वाकडे करण्यात आली आहे.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबईत पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी अलीकडेच बैठक घेतली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत बहुतांश नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका थांबविण्याचा आग्रह धरला. पक्षांतर्गत निवडणुकांत अनेकदा जनतेत व पक्षात प्रभाव नसलेली मंडळी निवडून आल्याचे दाखले उपस्थितांनी दिली. अशा पदाधिकाऱ्यांमुळे निवडणुकीत पक्षसंघटनेचा म्हणावा तसा प्रभाव पडला नसल्याचा दावाही केला. यावर कार्यकर्त्यांची भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. देशभरातूनच पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याच आग्रहाखातर निवडणूक पद्धतीचा अवलंब केल्याने ती मोडीत काढल्यास चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वी निवडणुकीऐवजी बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. लोकप्रतिनिधी, प्रस्थापित नेत्यांशी सल्लामसलतीनंतर हायकमांडकडून नावांची अंतिम घोषणा केली जात असे. सहमतीने होणाऱ्या या नियुक्त्यांमुळे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायचा. त्यामुळे पक्ष म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे शक्य होते, असा दावा नियुक्तीसाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांनी केला. मात्र नियुक्तीची पद्धत ठरावीक लोकांच्या फायद्याची असल्याची ओरड होऊ लागल्याने त्याऐवजी निवडणुका घेण्याचा पर्याय पुढे आला. (प्रतिनिधी)

Web Title: There are no elections within the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.