शिवसैनिक वाघ आहेत, त्यांच्या अंगावर जाऊ नका - उद्धव ठाकरे

By Admin | Published: April 15, 2015 01:57 PM2015-04-15T13:57:02+5:302015-04-15T14:06:15+5:30

एखादा व्यक्ती आमच्या अंगावर आला तर त्याला जुमानत नाही, शिवसैनिक वाघ हे त्यांनी लक्षात ठेवावं असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

There are Shivsena tigers, do not go to them - Uddhav Thackeray | शिवसैनिक वाघ आहेत, त्यांच्या अंगावर जाऊ नका - उद्धव ठाकरे

शिवसैनिक वाघ आहेत, त्यांच्या अंगावर जाऊ नका - उद्धव ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - आम्ही कोणाचही वाईट चिंतीत नाही, पण एखादा व्यक्ती आमच्या अंगावर आला तर त्याला जुमानत नाही, शिवसैनिक वाघ हे त्यांनी लक्षात ठेवावं असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. आर्शिवाद देणारे हात व मन दुखावल्यावर काय होते हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. 

मातोश्रीच्या अंगणात पार पडलेल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी काँग्रेसच्या नारायण राणे यांचा दारुण पराभव केला आहे. वांद्र्यात शिवसेनेचा झेंडा रोवल्यानंतर तृप्ती सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी आजच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यात उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला. पराभव कोणाचा झाला याला किंमत देत नाही. आमचा विजय हा महत्त्वाचा असतो असे त्यांनी सांगितले. आजच्या पराभवानंतर नारायण राणेंचे पुढील भवितव्य काय असा सवाल विचारण्यात आला असता ते म्हणाले, त्यांच भवितव्य काय असेल हे त्यांनी ठरवावं. काँग्रेस त्यांचं भलं करो, कारण देव तर त्यांच भलं करणार नाही. 

वांद्र्यातील विजयाचे श्रेय हे शिवसैनिकांचेच असून बाळा सावंत यांनी दिलेली आश्वासनं तृप्ती सावंत पूर्ण करतील अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मुस्लीम समाजानेेही शिवसेनेला मतदान केले असून आम्ही मुस्लीमांचा मताधिकार काढू नका असे म्हटलेच नव्हते. मुस्लीम मतांचे होणारे राजकारण थांबवले पाहिजे असे आमचे म्हणणे होते अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. 

Web Title: There are Shivsena tigers, do not go to them - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.