राज्यातील ६ साखर कारखाने झाले सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:28 AM2019-11-26T10:28:13+5:302019-11-26T10:32:45+5:30
लांबलेल्या पावसामुळे धुराडी उशिराने पेटली
पुणे : गेल्या वर्षीचा दुष्काळ व पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये यंदाचा ऊस गाळप हंगाम अडकला आहे. राज्यातील गाळप हंगाम एक ते दीड महिना विलंबाने सुरू झाला असून, सोमवार अखेरीस (दि. २५) जेमतेम सहा कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने ऊस क्षेत्र घटले होते. त्यातच आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व कारणांमुळे गत हंगामाच्या तुलनेत ऊस क्षेत्र ११.६२ लाख हेक्टरवरून ८.२२ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. गेल्या वर्षी १९५ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. तर, ९५२ लाख हेक्टर ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तसेच, साखरेचे उत्पादनदेखील ५८ लाख टनांच्या आसपास राहिले. यंदाच्या हंगामासाठी १६२ कारखान्यांनी केले अर्ज केले आहेत. त्यातील १२५ कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील माळेगाव, सोमेश्वर, दौंड शुगर, संगमनेर, यू टेक यांच्यासह आणखी एक कारखाना सुरू झाला आहे. गत हंगामाच्या तुलनेत यंदा ३३ कारखान्यांनी अर्जच केले नाहीत. तर, ३७ कारखान्यांकडे उसाच्या रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) रक्कम शिल्लक असल्याने त्यांचा परवाना मंजूर केला नसल्याची
माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
..........
पुराचा साडेतीन लाख टन उसाला फटका
राज्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
४सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
४तब्बल साडेतीन लाख टन ऊस पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झाला आहे.
..........
उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) गेल्यावर्षी प्रमाणे कायम आहे. दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये प्रतिटन व वरील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये अधिक दर देण्यात येईल. केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा किमान विक्री दरही ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका कायम आहे.
..........