राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:59 AM2020-02-25T02:59:02+5:302020-02-25T02:59:19+5:30

घरीच होते बाळंतपण; वाड्यावस्त्यांवर जाऊन गर्भवतींची नोंद

There are still ten thousand at risk in the state | राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसूती

राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसूती

googlenewsNext

- राजानंद मोरे 

पुणे : रुग्णालयात जाऊन सुरक्षित प्रसूती करण्याचे प्रमाण मागील दहा वर्षांत तब्बल १५ पटींनी वाढले आहे. मात्र, अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १० हजार प्रसूती जोखीम पत्करून रुग्णालयाबाहेर होत असल्याची स्थिती आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत सुमारे ९ हजार ९०० प्रसूती घरी झाल्या आहेत. तर २०१०-११ या वर्षात हे प्रमाण सुमारे दीड लाखाच्या पुढे होते.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून घरगुती प्रसूतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर जाऊन गर्भवती महिलांची नोंद ठेवली जाते. त्यांना रुग्णालयांमध्ये तपासणीला येण्यासाठी आग्रह केला जातो. खासगी रुग्णालयांकडूनही गर्भवती महिलांची माहिती संकलित केली जाते. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २०१०-११ या वर्षात महाराष्ट्रात घरगुती प्रसूतीचे प्रमाण सुमारे १ लाख ५९ हजार एवढे होते. त्यानंतर हे प्रमाण वेगाने कमी होत गेले आहे.

वर्ष २०१२-१३ मध्ये घरगुती प्रसूती चे प्रमाण पहिल्यांदाच एक लाखाच्या खाली आहे. यावर्षी सुमारे ६७ हजार महिलांची प्रसूती रुग्णालयाबाहेर झाली. मागील चार-पाच वर्षांमध्ये हा वेग पुन्हा मंदावल्याचे चित्र आहे. २०१६-१७ मध्ये सुमारे १५ हजार प्रसूती घरी झाल्या.
पुढील चार वर्षात त्यामध्ये केवळ चार हजारांची घट झाली. २०१०-११ नंतर पाच वर्षात घरगुती प्रसूतीचे प्रमाण सुमारे सव्वा लाखाने कमी झाले होते. २०१९-२० मध्ये जानेवारी अखेरपर्यंत १३ लाख ८२ हजार महिलांनी रुग्णालयात प्रसूतीला पसंती दिली. तर घरगुती प्रसूती चे प्रमाण ९ हजार ८६३ एवढे आहे. अजूनही ग्रामीण भागातील अनेक कुटूंबांमध्ये घरीच प्रसूती करण्यासाठी आग्रह केला जातो. काही ग्रामीण-आदिवासी भागामध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. काही वेळी प्रसूती साठी वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यात घरगुती प्रसूतीचे प्रमाण दहा हजाराच्या जवळपास आहे.

Web Title: There are still ten thousand at risk in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.