राज्यातील रस्त्यांवर तब्बल ३ कोटी ४८ लाख वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:46 AM2019-06-18T02:46:37+5:302019-06-18T06:23:19+5:30
दर लाख लोकसंख्येमागे ३१,०४७ वाहने
मुंबई : साडेबारा कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात तब्बल ३ कोटी ४८ लाख, ८८ हजार ८७० वाहने आहेत. एक लाख लोकसंख्येमागे ३१०४७ वाहने आहेत.
जानेवारी २०१९च्या या आकडेवारीनुसार दुचाकी वाहनांची संख्या २ कोटी ५५ लाख ७९६६९ आहे. मोटरगाड्या, जीप अशा चारचाकी मोटारींची संख्या ४८ लाख ६५८४२ इतकी आहे. राज्यात २०१७ आणि २०१८ चा विचार केला तर एक वर्षात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या २६ लाख ९१ हजार १०३ इतकी वाढली. स्वयंचलित रिक्षांची संख्या ८ लाख ५७२४ वरून ९६४६४१ वर गेली. रुग्णवाहिकांच्या संख्या मात्र फारच कमी वाढली आहे.
आधीच्या वर्षात ती १५०९३ होती; ती १५८७६ झाली. शाळा बसेसची संख्या एक वर्षात २६४३८ वरून २९२३१ वर गेली. ट्रॅक्टरच्या संख्येत मोठी वाढ झाली. ही संख्या ६ लाख ९३६४५ वरून ७५२२७९ वर गेली.