दादरीसारख्या घटना घडवल्या आहेत, आता दंगलीही घडवण्यात येतील - राज ठाकरे
By Admin | Published: October 10, 2015 01:35 PM2015-10-10T13:35:03+5:302015-10-10T14:04:16+5:30
दादरीसारख्या घटना या मुद्दामहून घडवल्या जात आहेत. हे सगळं निवडणुकांचं व सत्ता राखण्याचं राजकारण आहे. माझा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात देशात दंगली घडवल्या जातील
>ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १० - दादरीसारख्या घटना या मुद्दामहून घडवल्या जात आहेत. हे सगळं निवडणुकांचं व सत्ता राखण्याचं राजकारण आहे. माझा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात देशात दंगली घडवल्या जातील आणि कदाचित एखादं छोटंस युद्धही घडवलं जाईल असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे. विशेष म्हणजे, डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की दिल्लीत एका भाजपा नेत्याला मी हा माझा अंदाज सांगितले नी त्यांचं मत विचारलं त्यावर त्यांनी हे असं होऊ शकतं असं उत्तर दिलं. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ द्यायलाच नाही पाहिजे अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी मांडली. गुलाम अली हा फार मोठे गायक आहेत यात काही वाद नाहीत, पण पाकिस्तानचे आपले संबंध चांगले नसताना त्यांना बोलवायची काय गरज असा प्रश्नन त्यांनी विचारला. त्या देशामध्ये भारतीय कलाकारांना बोलवतदेखील नाहीत असे सांगत, आपल्याकडे काय कलाकारांची कमी आहे का असे विचारत आयोजकांवरही त्यांनी टीका केली.
कलाकार, खेळाडू, अक्रमसारखे कॉमेंटरी करणारे माजी खेळाडू अशा सगळ्यांना भारताचे रस्ते बंद करायले हवेत असे राज ठाकरे म्हणाले.
कल्याण -डोंबिवली शहरांचा आधीच विचका झालेला अाहे, महापालिकेत कामं होत नाहीयेत, अस असताना त्यात २७ गावांचा समावेश करून काय भलं होणार आहे असा सवाल विचारत या गावांना वेगळचं राहू द्यावे असे ते म्हणाले.