“राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण नाही, भाजपसोबत जाणाऱ्यांशी संबंध नाही”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:38 AM2023-08-15T05:38:00+5:302023-08-15T05:39:34+5:30

भाजपबाबत आमची देश आणि राज्य पातळीवर भूमिका स्पष्ट आहे, असे शरद पवार म्हणाले.

there is no atmosphere of confusion in the ncp there is no connection with those who go with the bjp said sharad pawar | “राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण नाही, भाजपसोबत जाणाऱ्यांशी संबंध नाही”: शरद पवार

“राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण नाही, भाजपसोबत जाणाऱ्यांशी संबंध नाही”: शरद पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलेही संभ्रमाचे वातावरण नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून संभ्रम तयार करू नका, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपबाबतची भूमिका स्पष्ट केली.

गोविंदबाग निवासस्थानी पवार  पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपबाबत आमची देश आणि राज्य पातळीवर भूमिका स्पष्ट आहे. भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध असण्याचे कारण नाही. आघाडीची बैठक मुंबईत ३१ ऑगस्टला  तर १ रोजी इंडियाची बैठक आहे. त्याची जबाबदारी माझ्यासह  उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासंबंधी मविआमध्ये काहीही चर्चा झालेली नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री झुकणार नाही - राेहित पवार 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला अडचणी दिसत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना दबाव टाकून फोडले जात आहे. शरद पवारांचा विचार समतेचा, पुरोगामी आणि  महाराष्ट्रधर्मी आहे. त्यामुळे त्यांच्यावर  कितीही दबाव टाकला, संकटे आणली, तरी हा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असे मत आमदार रोहित पवार यांनी लातूर येथे सोमवारी व्यक्त केले.  

सगळेच एकमेकांना मिळालेले : राज ठाकरे

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. हे सगळे एकमेकांना आतून मिळालेले आहेत. हे आजचे नाही. २०१४ पासून हे सुरू आहे. पहाटेचा शपथविधी आठवा तुम्हाला सगळे समजून जाईल, असे टिप्पणी ठाकरे यांनी केली.  शरद पवार आणि अजित पवारांना भेटायला जागा ‘चोरडीया’ याठिकाणी मिळाली ही कमालच म्हणावी लागेल, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. सगळीकडेच संभ्रम सुरू आहे. 

कोणकोणाचा आहे हेच कळत नाही. संभ्रम लवकरच दूर होईल अशी आशा आहे, असेही ठाकरे म्हणाले. मनसे येत्या निवडणुकांमध्ये कोणासोबत जाणार असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा असतो. आज कोणीही कुणासोबत जातो.


 

Web Title: there is no atmosphere of confusion in the ncp there is no connection with those who go with the bjp said sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.