कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप नाही! मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची ग्वाही

By यदू जोशी | Published: March 30, 2024 05:23 AM2024-03-30T05:23:49+5:302024-03-30T06:54:57+5:30

मुंबई : आमच्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष एकसमान आहेत. आम्ही कोणाला झुकते माप देणार नाही आणि कोणावर अन्यायही होऊ ...

There is no measure of leaning towards any political party! Chief Electoral Officer S. Chockalingam | कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप नाही! मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची ग्वाही

कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप नाही! मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची ग्वाही

मुंबई : आमच्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष एकसमान आहेत. आम्ही कोणाला झुकते माप देणार नाही आणि कोणावर अन्यायही होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

निवडणूक जाहीर होताच अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. प्रत्येक तक्रारीची आम्ही शहानिशा करतो. कोणत्याही राजकीय पक्षाने मग ते सत्तेत असोत वा नसोत, आयोगाला गृहीत धरू नये. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यास आम्ही बांधिल आहोत आणि त्यासाठी जेजे करता येईल ते केले जाईल. राजकीय पक्ष पाहून वागू नका, आचारसंहितेची अंमलबजावणी झालीच पाहिजे, आदेश धुडकावणारे आयोगाच्या रडारवर असतील, असा इशारा चोकलिंगम यांनी दिला.

प्रश्न : अन्य काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का कमी असतो. तो वाढविण्यासाठी  आपण काय करणार आहात? 
चोकलिंगम : महाराष्ट्रात हिंसाचार, मतदानावेळी गडबडी असे प्रकार बोटावर मोजण्याइतकेही होत नाहीत. फक्त ३९४ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. पण, मतदानाचा कमी टक्का हा चिंतेचा विषय आहे. २०१९च्या निवडणुकीत ६१% मतदान महाराष्ट्रात झाले, यावेळी ही टक्केवारी किमान ७५ टक्क्यांपर्यंत जावी, असा प्रयत्न आहे. आपल्याला नक्कीच मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल.   

वयोगटानुसार महाराष्ट्रातील मतदारांचे प्रमाण
वय    पुरुष    स्त्री    तृतीयपंथी    एकूण    टक्के 
१८-१९    ६९१८६३    ४८०४५४    १०१    ११७२४१८    १.२७
२०-२९    ९२८५१६४    ७४४१९९२    २१६०    १६७२९३१६    १८.१७
३०-३९    १०७६७०२५    १००२१७४७    १९७०    २०७९०७४२    २२.५९  
४०-४९    १०५४६४८२    ९६८६२०४    ८२१    २०२३३५०७    २१.९८
५०-५९    ७७४१८२३    ७६०९१३९    ३०९    १५३५१२७१    १६.६८
६०-६९    ५०१९९०१    ४७९२१९७    १२७    ९८१२२२५    १०.६६
७०-७९    २६३१२९०    २७०६९३४    ५७    ५३३८२८१    ५.८०
८०-८९    ९४४११५    ११५१६९५    १२    २०९५८२२    २.२८
९०+    २३४६७४    २९६९३९    १    ५३१६१४    ०.५८
एकूण    ४७८६२३३७    ४४१८७३०१    ५५५८    ९२०५५१९६    १००

वय    पुरुष    स्त्री    तृतीयपंथी    एकूण     टक्के
८५+    ५७५५२५    ७३८०९४    ४    १३१३६२३    १.४२७
१००+    २३४६६    २९३०२    १    ५२७६९    ०.०५७
 

Web Title: There is no measure of leaning towards any political party! Chief Electoral Officer S. Chockalingam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.