महाराष्ट्रात प्रशासन नावाची गोष्ट उरली नाही : थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:42 AM2022-07-28T06:42:13+5:302022-07-28T06:43:03+5:30

माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे जन्मशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थोरात दिल्लीत आले आहेत.

There is no such thing as administration in Maharashtra: Thorat | महाराष्ट्रात प्रशासन नावाची गोष्ट उरली नाही : थोरात

महाराष्ट्रात प्रशासन नावाची गोष्ट उरली नाही : थोरात

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या २८ दिवसांपासून महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. प्रशासन पूर्णपणे कोसळले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दिल्लीत केला. 

माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे जन्मशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थोरात दिल्लीत आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. राज्यात पावसाने हाहा:कार माजविला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असताना राज्यात मंत्रिमंडळ नाही, अशी अभूतपूर्व परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. मुंबईपासून गावपातळीपर्यंत प्रशासन पूर्णपणे ढासळलेले आहे. कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप थोरात यांनी केला.

Web Title: There is no such thing as administration in Maharashtra: Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.