महापालिकेच्या नळाला पाणी नाही; हनीमुनला आम्ही जाणार नाही, टँकरवरून निघाली वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:08 AM2022-07-08T07:08:17+5:302022-07-08T07:09:58+5:30

या अभिनव आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले.

There is no water in the kolhapur municipal tap; We will not go on honeymoon, new married couple agitation | महापालिकेच्या नळाला पाणी नाही; हनीमुनला आम्ही जाणार नाही, टँकरवरून निघाली वरात

महापालिकेच्या नळाला पाणी नाही; हनीमुनला आम्ही जाणार नाही, टँकरवरून निघाली वरात

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरात कशासाठी लोक काय करतील याचा नेम नाही... गुरुवारीही तसेच घडले. मंगळवार पेठेतील खासबाग परिसरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी प्रिन्स क्लबच्या वतीने नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टँकरवरून रात्री वरात 
काढण्यात आली.

या अभिनव आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. खासबागच्या प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे गुरुवारी विवाहबद्ध झाले, त्यानिमित्ताने त्यांची महाद्वार रोड मिरजकर तिकटी खासबाग परिसरातून हलगी-लेझीम, घुमक्याच्या तालावर वरात काढण्यात आली.

Web Title: There is no water in the kolhapur municipal tap; We will not go on honeymoon, new married couple agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.