आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:36 AM2023-01-31T08:36:11+5:302023-01-31T08:37:15+5:30

Ashok Chavan : वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत करायचा की नाही, याबाबत अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

There is still no discussion about Ambedkar's entry into the alliance, says former Chief Minister Ashok Chavan | आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

googlenewsNext

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत करायचा की नाही, याबाबत अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. भविष्यात ठाकरे हे महाविकास आघाडीत त्यांना घेण्याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतरच पुढील दिशा आणि भूमिका ठरेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. आम्हीदेखील त्यांचे स्वागत करतो, असेही चव्हाण म्हणाले.

केवळ नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाड्यासाठी पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा आहे. बाभळीचे महाराष्ट्रातून वाहून गेलेले पाणी थेट समुद्रात जात आहे. लवादाच्या निर्णयानुसार पाणी सोडावेच लागते. पाणीप्रश्नी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार केला. मीदेखील पाठपुरावा केला. परंतु, मार्ग निघाला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर मी निश्चित पाणी प्रश्नावर बोलणार, असे मतही त्यांनी मांडले. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागते, पुढे ते समुद्रात जाते. त्यामुळे त्याचा कुणालाच फायदा होत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नावर आपण त्यांच्याशी संवाद साधू, अशी भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली.  

आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे नांदेड येथे १ फेब्रुवारी रोजी येत आहेत. त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांनी बीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांच्याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका विशद केली.

Web Title: There is still no discussion about Ambedkar's entry into the alliance, says former Chief Minister Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.