सोयाबीन पिकावर किडिचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज.

By Admin | Published: August 24, 2016 01:28 PM2016-08-24T13:28:37+5:302016-08-24T13:28:37+5:30

सोयाबीन, मूग व उडिड पिकांवर वातावरणातील बदलांमुळे ऊंट अळी, शेंगा पोखर नारी अळी, स्पोडोप्टेरा, पाने खाणारी अळी, चक्रभुंगा व खोदमाशिची अळी अश्या किडिंचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणावर सुरु आ

There is a need to take care of soybean crop. | सोयाबीन पिकावर किडिचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज.

सोयाबीन पिकावर किडिचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज.

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २४ -  सोयाबीन, मूग व उडिड पिकांवर वातावरणातील बदलांमुळे ऊंट अळी, शेंगा पोखर नारी अळी, स्पोडोप्टेरा,   पाने खाणारी अळी, चक्रभुंगा व खोदमाशिची अळी अश्या किडिंचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणावर सुरु  आहे. यामधील ऊंट अळी, शेंगा पोखरणारी अळी व स्पोडोप्टेरा या किडिंचे प्रमाण जास्त आहे. हे  प्रमाण जास्त वाढणार असे संकेत वाटत आहेत.
 
या अळ्या सुरवातीला कोवळी पाने कतृण खातात, नंतर या अळ्या कळ्या, फुले , कोवळाल्या शेंगा वा शेंगातील दाणे खातात . या अळ्या पीक फुलाच्या किंवा शेंगांच्या अवस्तेत असताना फुलांवर / शेंगेंवर राहतात त्यामुळे बाहेरून प्रादुर्भाव लक्षात येत नाही. तशेच या अळ्या बारीक असताना लक्षात येत नाहीत म्हणून शेतकरी बांधवानी विशेष काळजी पूर्वक वेळोवेळी पाहणी करुन नियंत्रण करने आवश्यक आहे.
 
किडिंचे प्रमाण पाहुन  ऊंट अळी व शेँगा पोखरणारी अळी यांचे प्रमाण जास्त असल्यास ट्रायजोफोस् किंव्हा प्रोफेनोफोस्स किंवा क्लोरान्तरालिनिपोल औषाधाची फवारणी करावी.
 
मळकट हिरवी पाने खाणारी अळी व स्पोडोप्टेरा या किडिंचे प्रमाण जास्त वाटल्यास इंडोक्सीकारब या ओषधाची फवारणी करावी.
 

Web Title: There is a need to take care of soybean crop.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.