तिकिटासाठी ‘बेस्ट’ पर्याय नाही
By Admin | Published: September 3, 2016 01:54 AM2016-09-03T01:54:18+5:302016-09-03T01:54:18+5:30
तिकीट मशिनबाबत अनेक तक्रारींनंतरही ट्रायमॅक्स या कंपनीला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ शुक्रवारी देण्यात आली़ या कंपनीचे कंत्राट ३१ आॅगस्ट रोजी संपणार याची पूर्वकल्पना
मुंबई : तिकीट मशिनबाबत अनेक तक्रारींनंतरही ट्रायमॅक्स या कंपनीला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ शुक्रवारी देण्यात आली़ या कंपनीचे कंत्राट ३१ आॅगस्ट रोजी संपणार याची पूर्वकल्पना असतानाही अन्य पर्यायांसाठी बेस्टने वेळकाढू धोरण अवलंबत या कंपनीवरच मेहेरनजर दाखविली आहे़
बसगाड्यांमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकिटांची छपाई करणारी मशिन ट्रायमॅक्स या कंपनीमार्फत पुरविण्यात येते़ प्रति तिकीट दहा पैसे या कंपनीला देण्यात येतात़ मात्र मशिन बंद पडणे, एकाच वेळी दोन तिकिटे बाहेर पडणे, मशिनमध्ये तिकीट अडकणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचा भुर्दंड वाहकांना बसत होता़ तरीही या कंपनीवर बेस्ट प्रशासनाने आपली कृपा कायम ठेवली, असा आरोप काँग्रेसचे रवी राजा यांनी केला़ पाच वर्षांचे कंत्राट या कंपनीला देण्यात आल्याच्या सबबीखाली बेस्टने वेळ काढला़ मात्र आता कंत्राट संपल्यानंतरही नवीन कंपनी बेस्टने नेमलेली नाही़ (प्रतिनिधी)
ट्रायमॅक्सला
मुदतवाढ हा नाइलाज
ट्रायमॅक्स कंपनीला मुदतवाढ देणे हा आपला नाइलाज असून नवीन कंपनीला आणण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे़ पुढील तीन महिन्यांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट समितीला दिले़