आरोपातील आकडय़ांएवढे बजेटही नाही!

By Admin | Published: September 6, 2014 02:08 AM2014-09-06T02:08:39+5:302014-09-06T02:08:39+5:30

सन 1999पासून 2014र्पयतच्या 15 वर्षामधील राज्याचे अर्थसंकल्प पाहिल्यास ते एकत्रितपणो 5 लाख कोटी रुपयांचेदेखील होणार नाहीत.

There is no budget as per the figures of the accused! | आरोपातील आकडय़ांएवढे बजेटही नाही!

आरोपातील आकडय़ांएवढे बजेटही नाही!

googlenewsNext
- अजित पवार यांची टीका
पुणो : सन 1999पासून 2014र्पयतच्या 15 वर्षामधील राज्याचे अर्थसंकल्प पाहिल्यास ते एकत्रितपणो 5 लाख कोटी रुपयांचेदेखील होणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने 12 लाख कोटींचा घोटाळा केला असे जे वक्तव्य आहे, ते एका जबाबदार पक्षाच्या अध्यक्षांना शोभत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा गुरुवारी मुंबईभेटीवर आले होते. षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत विचारले असता पवार यांनी उपरोक्त टीका केली. गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक 5क् हजार कोटींचे होते, त्याआधीचे 45 हजार कोटींचे होते. दरवर्षी त्यात 1क् ते 12 टक्के वाढ होते. तरीही गेल्या 15 वर्षामधील सर्व अंदाजपत्रकांची रक्कम एकत्र केली तरी 5 लाख कोटींची होणार नाही. त्यामुळे अशी मांडणी करणो चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

 

Web Title: There is no budget as per the figures of the accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.