उत्सवाच्या मंडपांसाठी ज्यादा शुल्क नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 02:52 AM2016-09-17T02:52:32+5:302016-09-17T02:52:32+5:30

सण-उत्सवांच्या काळात उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या मंडपांसाठी आकारण्यात येणारे ज्यादा शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे.

There is no charge for festival pavilions | उत्सवाच्या मंडपांसाठी ज्यादा शुल्क नाही

उत्सवाच्या मंडपांसाठी ज्यादा शुल्क नाही

Next

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या मंडपांसाठी आकारण्यात येणारे ज्यादा शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. एखाद्या इव्हेंटप्रमाण धार्मिक मंडळांकडून शुल्क आकारण्याचे परिपत्रक पालिका प्रशासनाने शुक्रवारी मागे घेतेले.
सण-उत्सवाचा काळ प्रचारासाठी उत्तम माध्यम असताना प्रशासनाच्या या परिपत्रकाने राजकीय पक्षांची गोची केली होती. पुढच्या वर्षी पालिकेची निवडणूक असल्याने हे परिपत्रक रद्द करण्यासाठी राजकीय वजन वापरण्यात येत होते. गणेशोत्सव काळात आलेले हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली, तर समाजवादी पक्षाने सर्व धर्मांच्या उत्सवांना परिपत्रकातून वगळण्यात यावे, अशी ठरवाची सूचना पालिका सभागृहात केली होती. अखेर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी ही मागणी मान्य करीत परिपत्रक शुक्रवारी मागे घेतले आहे. मात्र सणांचा व्यवसाहिक वापर करून नागरिकांकडून शुल्क वसूल करणाऱ्या मंडळांना याच लाभ मिळणार नाही.

अशी होती शुल्क आकारणी
५०० चौरस फुटांच्या मंडपसाठी एक दिवसाचे ११ हजार रुपये
सात दिवसांचे २३ हजार रुपये
१००० चौरस फुटांच्या मंडपसाठी एक दिवसाचे १५ हजार रुपये
सात दिवसांसाठी ३९ हजार रुपये
१००० चौरस फुटांवरील मंडपाना एक दिवसासाठी २७ हजार तर सात दिवसांसाठी ५१ हजार रुपये

Web Title: There is no charge for festival pavilions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.