‘एपीएमसी’वर बंदचा परिणाम नाही

By admin | Published: June 6, 2017 05:47 AM2017-06-06T05:47:06+5:302017-06-06T05:47:06+5:30

शेतकऱ्यांनी राज्यभर घोषित केलेल्या बंदचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर काहीही परिणाम झालेला नाही

There is no closing effect on 'APMC' | ‘एपीएमसी’वर बंदचा परिणाम नाही

‘एपीएमसी’वर बंदचा परिणाम नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शेतकऱ्यांनी राज्यभर घोषित केलेल्या बंदचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर काहीही परिणाम झालेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून ५००पेक्षा जास्त ट्रक-टेम्पोमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. होलसेल मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरण्यास सुरुवात झाली असून, किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडणे सुरूच आहे.
शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केल्यानंतरही नवी मुंबई, पनवेल परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मुंबई बाजार समितीमधील आवकही पूर्ववत झाली आहे. १ जूनपासून राज्यातील भाजीपाला विक्रीसाठी येत नव्हता. पूर्णपणे परराज्यातील मालावर अवलंबून राहावे लागत होते; परंतु सोमवारी सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगरमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. आवक पूर्ववत झाल्यामुळे होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
>किरकोळ बाजारात पूर्वीचाच दर
शनिवारी १६ ते २४ रुपये किलो दराने विकला जाणारा कोबी ८ ते १२ रुपयांवर आला आहे. टोमॅटो ३६ ते ४० वरून १८ ते २२ व फ्लॉवर २४ ते ३० वरून १० ते १६ रुपये किलो दराने विकला गेला आहे.
एपीएमसीमध्ये बाजारभाव कमी झाले असले, तरी किरकोळ बाजारामध्ये मात्र पूर्वीच्याच दराने भाजीपाला विकला जात होता. ८० ते १२० रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे. ६ जूनलाही आवक वाढली तर बाजारभाव कमी होतील.
>देशभरातून विक्रीस आलेल्या
कृषी मालाचा तपशील
वस्तूराज्य ट्रक-टेम्पो
लिंबूआंध्र प्रदेश, कर्नाटक०४
आलेसातारा०४
अरबीमध्य प्रदेश०२
भेंडीगुजरात, महाराष्ट्र३१
फरसबीदिल्ली, महाबळेश्वर०३
फ्लॉवरकोल्हापूर, नगर, पुणे२५
गाजरमध्य प्रदेश, महाराष्ट्र१५
काकडीजुन्नर, ओतूर३२
कारली गुजरात०५
कोबीकर्नाटक, दिल्ली२९
शेवगा शेंगतामिळनाडू०६
सुरणआंध्र प्रदेश०३
टोमॅटोगुजरात, महाराष्ट्र६२
वाटाणादिल्ली०९
मिर्चीउत्तर प्रदेश२०
>वस्तू४ जून५ जूनकिरकोळ
कारली१४ ते २४ २८ ते ३२८०
कोबी१६ ते २४८ ते १२८०
ढोबळी ४० ते ५०३० ते ३६८०
मिर्ची
फ्लॉवर२४ ते ३०१० ते १६८० ते १२०
फरसबी२० ते ५०३६ ते ५०१०० ते १६०
भेंडी३० ते ३४३० ते ३४८०
शेवगा२८ ते ३६३० ते ३४८० ते १००
टोमॅटो३६ ते ४०१८ ते २२८० ते १२०

Web Title: There is no closing effect on 'APMC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.