एलबीटीच्या बैठकीत एकमत नाही

By admin | Published: June 9, 2014 11:47 PM2014-06-09T23:47:55+5:302014-06-09T23:47:55+5:30

एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या तीन पर्यायांवर विचार करण्यासाठी रविवारी वाशीत झालेल्या व्यापा:यांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही.

There is no consensus in LBT meeting | एलबीटीच्या बैठकीत एकमत नाही

एलबीटीच्या बैठकीत एकमत नाही

Next
>नवी मुंबई : एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या तीन पर्यायांवर विचार करण्यासाठी रविवारी वाशीत झालेल्या व्यापा:यांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. ही बैठक फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रने (फॅम) आयोजित केली होती. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे फॅमचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी बैठकीनंतर सांगितले.
शासनाने एलबीटी रद्द करावा, याकरिता व्यापा:यांनी बंदचा इशारा दिला होता. या बंदपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी रविवारी व्यापा:यांची भेट घेतली. फॅम संघटनेच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यापा:यांपुढे तीन पर्याय ठेवल्याचे गुरनानी यांनी सांगितले. 
व्यापा:यांचा टॅक्स भरण्याला विरोध नाही़ मात्र, त्यांना एलबीटी नको आहे, असे सांगून गुरनानी यांनी मुख्यमंत्र्यांनी ठेवलेले तीन पर्याय बैठकीत चर्चेसाठी मांडले. हे पर्याय असे, एलबीटीची वसुली व्हॅट विभाग करणार, शहराच्या प्रवेशद्वारावरच क्रुड, पेट्रोल, डीङोल आदींचा एलबीटी घेतला जाईल अथवा ऑक्ट्रॉय आणि  एलबीटी यापैकी एकाची निवड स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. यावर चर्चेसाठी राज्यातील व्यापा:यांची बैठक झाली. अंतिम निर्णयाकरिता किमान दोन दिवस लागतील, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
 
 
4एलबीटीच्या मुद्यावर व्यापा:यांनी आता आक्रमक पवित्र घेतला आहे. येत्या तीन-चार दिवसांत यावर निर्णायक तोडगा निघाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोहन गुरनानी यांनी सोमवारी दिला. हे तिन्ही पर्याय अव्यवहार्य असून एलबीटीबाबत निर्णय घेण्याची शासनाची मानसिकता नसल्याचा आरोप गुरनानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: There is no consensus in LBT meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.