१६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

By यदू जोशी | Published: February 16, 2018 01:40 AM2018-02-16T01:40:25+5:302018-02-16T01:41:29+5:30

प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.

 There is no crematorium in 16 thousand villages! Rescued, not rescued from death, tortured even by death ' | १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

१६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही! जगण्याने न केली सुटका, मरण्यानेही छळले आहे’

Next

मुंबई : प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. लोक जागा मिळेल तिथे आप्तेष्टांचा अंत्यविधी उरकतात. दलितांची तर आणखीच दारुण अवस्था आहे. मरणानंतरही जात न सुटणाºया समाजात त्यांना अनेकदा अंत्यसंस्कारांसाठी जागाच मिळत नाही.
या गावांत स्वत:च्या मालकीच्या जागेत, शेतात वा पडीक सरकारी जमिनीवर अंत्यसंस्कार उरकले जातात. उघड्यावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही सुविधा नसतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये तर मृतदेह अर्धवट जळून त्यांची अक्षरश: विटंबना होते. अनेक गावे अशी आहेत की, जिथे सवर्ण जातींतील व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात तिथे दलितांना अंत्यविधी करण्यास मनाई केली जाते. त्यातून तणावाचे प्रसंग निर्माण होतात.
मराठवाड्यातील लालसेनेचे नेते गणपत भिसे यांनी या प्रश्नावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावला आहे. प्रगत महाराष्ट्रात मरणानंतरही माणसांचे हाल का व्हावेत, असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील ज्या २८ हजार २१ खेड्यांबाबत माहिती एकत्रित करता आली. त्यातील १६ हजार गावांमध्ये स्मशानभूमींची महसूल खात्याकडे नोंद नाही. उर्वरित गावांमध्ये स्मशानभूमीची नोंद आहे; पण तिथे स्मशानभूमी आहे असे नाही. अनेक गावांत स्मशानभूमींच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. स्मशानभूमीच नसलेल्या गावांत शेतांमध्ये, नदी वा ओढ्याच्या काठावर, गायरान, महारवतनाच्या जागेवर अंत्यविधी केले जातात. या पार्श्वभूमीवर, स्मशानभूमींपासून वंचित असलेल्या गावांत एका मॉडेलच्या आदर्शस्मशानभूमी उभाराव्यात आणि तिथे सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना समोर आली आहे. एक गाव एक पाणवठा या संकल्पनेने महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालून दिले, एक गाव, एक स्मशानभूमी मात्र अजूनही १६ हजार गावांच्या नशिबी नाही. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, असे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिले. मात्र स्मशानभूमींअभावी राज्याच्या ग्रामीण भागात, जगण्याने न केली सुटका, मरणानेही छळले आहे’.

स्मशानभूमीच नसलेल्या गावांची विभागनिहाय संख्या
कोकण २२३७
नाशिक २४८२
पुणे ३५७८
नागपूर २७०१
अमरावती २४१७
औरंगाबाद २७८१

Web Title:  There is no crematorium in 16 thousand villages! Rescued, not rescued from death, tortured even by death '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.