दुहेरी खुनाचा उलगडा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 05:02 AM2017-04-06T05:02:59+5:302017-04-06T05:02:59+5:30

महाविद्यालयीन युवक-युवतीच्या खुनाने खळबळ माजली असताना तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूून काही सुगावा लागलेला नाही.

There is no double murder plot | दुहेरी खुनाचा उलगडा नाहीच

दुहेरी खुनाचा उलगडा नाहीच

Next

लोणावळा (जि. पुणे) : महाविद्यालयीन युवक-युवतीच्या खुनाने खळबळ माजली असताना तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूून काही सुगावा लागलेला नाही. बुधवारी पोलिसांच्या पथकाने सिंहगड महाविद्यालयाचे प्रशासन व मृत युवक व युवती यांचे मित्र-मैत्रिणी तसेच इतर विद्यार्थी यांच्याकडे कसून तपास केला. घटनास्थळाची पुन्हा एकदा छाननी करण्यात आली.
आयएनएस शिवाजी समोरील एस पॉर्इंट येथील डोंगरावर रविवारी रात्री झालेल्या महाविद्यालयीन युवक-युवती यांच्या दुहेरी खुनाचा तपास वेगात सुरू असला तरी पोलिसांच्या हाती ठोस काही लागलेले नाही.
सिंहगड महाविद्यालयात तंत्र अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोघांचा डोक्यात व शरीरावर वार करून रविवारी रात्री खून करण्यात आला होता. सोमवारी दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर सर्व संभाव्य शक्यतांचा मागोवा घेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार करून तपास सुरू केला आहे. रविवारी सायंकाळपासून श्रुती होस्टेलमध्ये नव्हती. ती कुठे व कशासाठी होस्टेलबाहेर गेली होती? याबाबत तिने काही माहिती व्यवस्थापनाला दिली होती का? घरातील कोणाशी तिचे याबाबत बोलणे झाले होते का? सार्थकने तो कोठे चालला आहे, याबाबत त्यांच्या रूममेटला काही सांगितले होते का? याचा तपास करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
सिंहगड महाविद्यालय तिसऱ्या दिवशीही बंद
खुनाच्या घटनेमुळे सिंहगड महाविद्यालयात शोककळा पसरली असून, सलग तिसऱ्या दिवशी महाविद्यालय बंद ठेवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: There is no double murder plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.