आर्थिक निविदांसाठी मुदतवाढ नाही

By admin | Published: January 4, 2017 01:14 AM2017-01-04T01:14:57+5:302017-01-04T01:14:57+5:30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामासाठी पात्र ठरलेल्या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जानेवारी

There is no extension for financial statements | आर्थिक निविदांसाठी मुदतवाढ नाही

आर्थिक निविदांसाठी मुदतवाढ नाही

Next

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामासाठी पात्र ठरलेल्या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जानेवारी, २0१७ रोजी संपत आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांना यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोने ५ फेब्रुवारी, २0१४ रोजी जागतिक निविदा काढल्या होत्या. त्याला एकूण चार कंपन्यांनी प्रतिसाद देत, विनंती पात्रता प्रस्ताव (आरएफक्यू) सिडकोला सादर केले होते. यात जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झ्युरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्यांचा समावेश होता. यापैकी जीएमआर आणि जीव्हीके या कंपन्यांनी अनुक्रमे हैदराबाद, दिल्ली, तसेच मुंबई व बंगळुरू या विमानतळांची उभारणी केली आहे. सिडकोच्या प्रक्रियेत या चारही कंपन्यांचे प्रस्ताव पात्र ठरले होते; परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने झ्युरीच एअरपोर्ट -हिरानंदानी ग्रुप या भागीदारी कंपनीची निविदा सुरक्षेच्या मुद्द्यावरून बाद ठरविली होती. त्यामुळे स्पर्धेत केवळ तीनच कंपन्या उरल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या तीन कंपन्यांना अंतिम आर्थिक निविदा सादर करण्यास ७ नोव्हेंबर, २0१६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच स्पर्धेतून बाद ठरलेल्या हिरानंदानी ग्रुपनेही आपली पात्रता सिद्ध करीत, तीन महिन्यांपूर्वी अंतिम निविदा प्रक्रियेत प्रवेश मिळविला.

विमानतळ प्रकल्प उभारणीसाठी पात्रतापूर्व व तांत्रिक निविदा प्रक्रियेतून आर्थिक निविदा (आरएफपी) सादर करण्यासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांना यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. नियोजित वेळेत प्रकल्प उभारण्यासाठी मुदतवाढ न देण्याची सिडकोची भूमिका आहे.
- भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: There is no extension for financial statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.