बलात्कारित महिलेसोबत महिला अधिकारी नाही

By admin | Published: June 6, 2017 02:05 AM2017-06-06T02:05:58+5:302017-06-06T02:05:58+5:30

महिलेची वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जाण्यास महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय तपासणीच रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.

There is no female officer with the raped woman | बलात्कारित महिलेसोबत महिला अधिकारी नाही

बलात्कारित महिलेसोबत महिला अधिकारी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाह करण्याचे आश्वासन देत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून नितीन पांचाळ या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या चारकोप पोलीस ठाण्यात पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जाण्यास महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय तपासणीच रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.
विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून मोबाईलवर अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून मालाड (पूर्व) येथील महेंद्र नगरातील नितीन पांचाळ याच्याविरूद्ध चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या नितीन पांचाळ फरार झाला आहे.
सहा वर्षांपूर्वी आपली नितीन पांचाळ याच्याशी ओळख झाली. आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून नितीन पांचाळ याने आपल्याशी विवाह करण्याचे वचन दिले. त्या दरम्यान आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी आपला विश्वास संपादन करून एक लाख रूपयांची मागणी केली. विवाह करण्याचे ठरले असल्याने आपण तीन टक्के व्याजाने त्याला कर्ज काढून दिले. बरेच दिवस ती रक्कम परत न केल्याने आपण विचारणा केली असता त्याने धमकावल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पैसे मागितल्यानंतर पांचाळने मोबाईलमधील माझ्या नकळत काढलेले माझे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. काही फोटो त्याने आपल्या मोबाईलवरही पाठवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ करीत होते. मात्र राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी खासदार हुसेन दलवाई यांना निवेदन पाठवले. त्यावरून दलवाई यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असला तरी वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जायला महिला पोलीस उपलब्ध नसल्याने २0 मे रोजी गुन्हा दाखल झाला तरी अद्याप वैद्यकीय तपासणी रखडल्याचे सांगण्यात येते.

Web Title: There is no female officer with the raped woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.