सुधारणाच नाही, तिथं समानता कसली?
By admin | Published: March 8, 2017 07:59 AM2017-03-08T07:59:12+5:302017-03-08T08:16:23+5:30
वरकरणी स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा आपण कितीही मारत असलो, सुधारणा दिसत असल्या तरी आपल्याकडे अजूनही सामाजिक सुधारणांची मोठी गरज आहे. आणि तेच आपलं आजच्या समोरचं आव्हानही आहे.
वरकरणी स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा आपण कितीही मारत असलो, सुधारणा दिसत असल्या तरी आपल्याकडे अजूनही सामाजिक सुधारणांची मोठी गरज आहे. आणि तेच आपलं आजच्या समोरचं आव्हानही आहे.
- भारतात महिलांना आजही पुरुषांपेक्षा २५% कमी वेतन मिळतं.
- भारतात आजही ७० % महिला कामाच्या जागी होणारा लैंगिक छळ मुकाट सहन करतात. भीतीनं, लोकलज्जेस्तव आणि परिणामांच्या काळजीनं नोकरी करणाऱ्या महिला गप्प बसतात.
- भारतात आजही सुमारे १२ कोटी महिलांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजलंच जात नाही. त्या काम करतात पण त्यांना त्याचा योग्य मेहनताना मिळत नाही आणि अल्पसा मिळालाच तर त्याची योग्य ती मोजदाद होत नाही.
- गेल्या दोन दिवसात प्रसिद्ध झालेले हे काही उदाहरणं दाखल अहवाल आहेत. त्यांनी भारतातल्या महिलांच्या चालू वर्तमानाकाळातील प्रश्नांवर आकडेवारीसह बोट ठेवलेलं आहे. आणि या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात मोठ्या सामाजिक आणि कायदेशीर सुधारणा अर्थात रीफॉर्म्सची गरजही व्यक्त केली आहे.
- सर्वत्र महिला दिनाची चर्चा असताना या कळीच्या मुद्दयांना हात घातला जाईल का हाच खरा मोठा प्रश्न आहे. मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स अर्थात एमएसआय च्या अभ्यासानुसार भारतात आजही वेतनश्रेणीमध्ये लींगभेद मोठ्या प्रमाणात आहे.
- २०१६मध्ये म्हणजे अगदी अलिकडेच केलेल्या अभ्यासानुसार ६८.५% नोकरदार भारतीय महिलांना असं वाटतं की कामाच्या जागी त्यांच्यासंदर्भात भेदभाव केला जातो. त्यांना पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन दिलं जातं.विशेष म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ही वेतनदरी आहेच, आणि ती कमीअधिकही आहे. मात्र सर्वच क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलांना कमी वेतन दिलं जातं असं ही आकडेवारी सांगते.
- पुुरुषांपेक्षा महिला सरासरी १४२ रुपये दर तासाला कमी पगार घेतात असं हा अभ्यास सांगतो. आशेचं टोक एवढंच या अभ्यासाला की २०१४ च्या तुलनेत २०१६मध्ये हे वेतन अंतर कमी होताना दिसतं आहे. पण ते आजही आहे.
- एकीकडे वेतन कमी मिळत असताना दुसरीकडे लैंगिक छळाच्या तक्रारीही कमी झालेल्या नाही. इंडियन बार असोससिएननेच नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ७०% बायका कामाच्या जागी होणारा लैंगिक छळ मुकाट सहन करतात. आणि दुर्देव हेच की २०१५च्या तुलनेत लैंगिक छळाच्या तक्रारीत वाढ झालेली दिसते आहे.
- आणि वाढ किती तर दुप्पट वाढ. नॅशनल क्राईम रेकॉडर्स ब्युरोच्या आकडेवारनुसार कामाच्या जागी होणाऱ्या छळाच्या २०१४-१५ मध्ये ५७ ते ११९ तक्रारी नोंदवल्या गेल्या हातेया. तर लैंगिक छळाच्या तक्रारी ४६९ ते ७१४ इतक्या नोंदवल्या गेल्या. या तक्रारींमध्ये ५१ % वाढ झालेली दिसते आहे.आणि त्याविषयी मात्र उघड बोलणं, तक्रार करणं याचं प्रमाण अजूनही कमी आहे असं बार असोसिएशनच्या अहवालाचं म्हणणं आहे.