...तर शासकीय कर्मचा-यांना वेतनवाढ, पदोन्नती नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 04:16 PM2018-07-04T16:16:20+5:302018-07-04T16:16:26+5:30
अ, ब व क संवर्गाचा समावेश
गणेश वासनिक
अमरावती : राज्य शासनाच्या आस्थापनेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणक हाताळणी आणि वापराचे परिपूर्ण ज्ञान अनिवार्य आहे. अन्यथा यापुढे कर्मचाºयांना वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
शासन-प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असलेल्या कर्मचाºयांना बदलत्या काळानुसार त्यांचे ज्ञानात अधिक भर पडावी. प्रशासनाकडून नागरिकांचे कामे सुलभतेने आणि वेळेपूर्वी व्हावे, यासाठी गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचा-यांना संगणकाचे ज्ञान अनिवार्य केले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९९९ रोजीच्या अधिसूचनेद्वारे ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. शासन अधिसूचना २५ जानेवारी १९९९ व ३ मे २००० आणि २८ मे २०१८ अन्वये शासकीय कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान आवश्यक केले आहे. मात्र, बहुतांश विभागातील समावेश गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांनी अद्यापही संगणक हाताळणी, वापराचे ज्ञान विकसित केले नाही. त्यामुळे अशा कर्मचाºयांकडे असलेल्या नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत होत नाही. कार्यालयप्रमुखांनी अनेकदा संगणकाचे ज्ञान नसलेल्या कर्मचा-यांना नोटीस वजा आदेशान्वये शासन निर्णयाची जाणीव करून दिली आहे. परंतु, सरकारी कर्मचारी म्हटले की, ‘काय होते’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे.
मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी ३ जुलै २०१८ रोजी परिपत्रक जारी करून कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास वेतनवाढ, पदोन्नती मिळणार नाही, असे आदेश निगर्मित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांवर सोपविली आहे. राज्यात १९ लाख कर्मचारी असून, यात सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचा समावेश आहे.
वयाची ५० वर्षे पूर्ण करणा-यांना सूट
शासन सेवेतील गट अ, ब, आणि क संवर्गातील कर्मचाºयांना संगणकाचे ज्ञान नसल्यास पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही, असे आदेश आहेत. मात्र, या आदेशातून वयाची ५० वर्षे पूर्ण करणाºया कर्मचा-यांना सूट देण्यात आली आहे. कर्मचाºयांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण नसले तरी वय ५० पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा शासन निर्णयानुसार लाभ मिळणार नाही, हे वास्तव आहे.
बदलत्या काळानुसार कर्मचाºयांना कामात बदल करणे अपेक्षित आहे. नागरी सुविधांमध्ये झपाट्याने आमूलाग्र बदल होत असल्याने कर्मचा-यांनी संगणकाचे ज्ञान प्राप्त करणे काळाची गरज आहे. यापूर्वीच कर्मचा-यांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षणाबाबत मााहिती दिली आहे.
- नामदेव गडलिंग,
जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अमरावती