शिक्षक होण्यासारखे भाग्य नाही

By admin | Published: July 10, 2017 03:52 AM2017-07-10T03:52:01+5:302017-07-10T03:52:01+5:30

मुलांच्या सान्निध्यात शिक्षकांना ऊर्जा मिळते. आपले विद्यार्थी जेवढे मोठे होतील तेवढी शिक्षकांची उंची वाढते

There is no luck to be a teacher | शिक्षक होण्यासारखे भाग्य नाही

शिक्षक होण्यासारखे भाग्य नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुलांच्या सान्निध्यात शिक्षकांना ऊर्जा मिळते. आपले विद्यार्थी जेवढे मोठे होतील तेवढी शिक्षकांची उंची वाढते, खरोखरच शिक्षक होण्यासारखे भाग्य नाही, असे मनोगत ज्येष्ठ गुरु वर्य द. म. मेहेंदळे यांनी व्यक्त केले.
ठाण्याचे मो. ह. विद्यालय यंदा आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१८९२-२०१७) साजरे करीत आहे. त्याअंतर्गत शनिवारी गुरु वर्य स. वि. कुलकर्णी वाचनालयात प्राथमिक, पूर्व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २५ वर्षांची सेवापूर्ती केल्याबद्दल सत्कार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. त्यात १५ जणांचा समावेश होता. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मेहेंदळे उपस्थित होते. ते म्हणाले की, शिक्षक म्हणून माझ्या जडण घडणीत गुरु वर्य हरी शंकर लेले, एरंडेस्वामी व स. वि. कुलकर्णी या त्रिमूर्तीचे अमोल योगदान आहे. शिक्षक म्हणजे उत्साहाचे उधाण असले पाहिजे. शालेय समिती अध्यक्ष पंडित चौघुले या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. रोहिणी रसाळ, रवींद्र तामरस, शिरीष अत्रे, बाळासाहेब खोल्लम व्यासपीठावर उपस्थित होते. जान्हवी साळुंके यांनी मानपत्र वाचन केले. शुभदा साठे यांनी सत्कारमूर्तीच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. अरु णा पाटील व माया बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: There is no luck to be a teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.