शपथ घेताना नाव 'आठवले' नाही

By admin | Published: July 5, 2016 11:30 AM2016-07-05T11:30:26+5:302016-07-05T15:34:26+5:30

राष्ट्रपती भवनात रामदास आठवलेंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, मात्र शपथ घेताना उत्साहाच्या भरात रामदास आठवले नाव घ्यायचं विसरल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली

There is no name 'Athavale' when taking oath | शपथ घेताना नाव 'आठवले' नाही

शपथ घेताना नाव 'आठवले' नाही

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 05 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार झाला असून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी राष्ट्रपती भवनात इतर मंत्र्यांसह रामदास आठवलेंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र शपथ घेताना उत्साहाच्या भरात रामदास आठवले नाव घ्यायचं विसरल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली.  
 
महाराष्ट्रातून धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना संधी देण्यात आल्याने सर्वांचं त्यांच्या शपथविधीकडे लक्ष होतं. पण शपथविधीदरम्यान रामदास आठवले काहीसे गोंधळलेले आणि स्वत:चं नावच घेण्यास विसरले.
 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सर्व मंत्र्यांना शपथ देत होते. राष्ट्रपतींनी मी….., अशी सुरुवात करुन दिली. त्यावेळी मी …. या ठिकाणी आठवलेंनी स्वत:चं नाव घेणं आवश्यक होतं. मात्र त्यांनी नावही गाळून पुढे शपथ वाचण्यास सुरुवात केली. मात्र त्याचवेळी राष्ट्रपतींनी आठवलेंना थांबवून नाव घेण्यास सांगितलं. त्यामुळे रामदास आठवलेंना पुन्हा शपथ घ्यावी लागली. 
 

Web Title: There is no name 'Athavale' when taking oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.