ठाण्यात अधिकृत धार्मिक स्थळच नाही

By admin | Published: June 28, 2016 02:51 AM2016-06-28T02:51:22+5:302016-06-28T02:51:22+5:30

रस्त्यांत बाधित होणारी धार्मिक स्थळे हटवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.

There is no official religious place in Thane | ठाण्यात अधिकृत धार्मिक स्थळच नाही

ठाण्यात अधिकृत धार्मिक स्थळच नाही

Next

नामदेव पाषाणकर,

घोडबंदर- रस्त्यांत बाधित होणारी धार्मिक स्थळे हटवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. ठाणे महापालिकेकडे रस्त्यांतील धार्मिक स्थळांची आकडेवारी उपलब्ध  नसल्याचे दिसून येत आहे. मात्र,  शहरात विविध धर्मांची एकूण  अनधिकृत ७१४ धार्मिक स्थळे असल्याची माहिती अतिक्र मण विभागाकडे आहे. यात १९६० पूर्वीची केवळ सहा धार्मिक स्थळे आहेत.
तसेच १९६० पासून २००९ पर्यंत १२७ स्थळे निष्कासित केली जाऊ शकत असल्याचा अहवाल आहे. ५८७ धार्मिक स्थळांचा पुनर्विकास करण्याचा शेरा शहर विकास विभागाने दिला आहे. धार्मिक स्थळांचा मुद्दा जनतेच्या भावनांशी जोडला जात असल्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न कोणत्याही यंत्रणेकडून केला जात नाही. मात्र, रस्त्यांत येणारी स्थळे हटवावीत, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे अशी स्थळे काढावी लागत आहेत. ठाण्यात अशी प्रार्थनास्थळे क्वचित असतील, अशी माहिती प्रशासन देत आहे.
महापालिका भवनसमोर असलेले हनुमान मंदिर हटवताना पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे ज्या प्राधिकरणाच्या जागेत धार्मिक स्थळे आहेत, त्या जागेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आल्यास तेथील धार्मिक स्थळाचा पुनर्विकास करता येईल, असे शहर विकास विभागाने म्हटले आहे.
सर्वात जास्त १३९ धार्मिक स्थळे रायलादेवी प्रभागात असून माजिवडा-मानपाडा येथे ११३, कळवा ९५, वर्तकनगर ७५, वागळे ७३, दिवा-शीळ ४९, कोपरी ४०, मुंब्रा ५५, नौपाडा ४८, उथळसर २७ धार्मिक स्थळे आहेत.
>कारवाईच्या वेळी नागरिकांचा रोष
ठाणे शहरात एकूण १७ विविध प्राधिकरणे आहेत. त्यांच्या जागांवर वसलेल्या अतिक्र मणांच्या जागेत सर्वात अधिक स्थळे आहेत. त्या जागांचा विकास झाला तरच तेथील धार्मिक स्थळे अधिकृत होऊ शकणार आहेत.
तोवर, सर्व धार्मिक स्थळांचा अनधिकृतमध्ये समावेश राहणार आहे. नुकत्याच रस्ता रु ंदीकरण झालेल्या पोखरण रोडमध्ये बाधित झालेली मंदिरे हटवताना नागरिकांचा पालिकेला रोष पत्करावा लागला होता.

Web Title: There is no official religious place in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.