प्लास्टिकच्या अंड्याच्या दाव्यात किती तथ्य; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:08 PM2020-01-14T12:08:50+5:302020-01-14T12:10:28+5:30

बाजारात प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची अफवा

there is no plastic eggs national egg coordination committee proves with demo | प्लास्टिकच्या अंड्याच्या दाव्यात किती तथ्य; जाणून घ्या सत्य

प्लास्टिकच्या अंड्याच्या दाव्यात किती तथ्य; जाणून घ्या सत्य

Next

पुणे: बाजारात प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा खुलासा ‘नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी’नं (एनईसीसी) केला. यासाठी एनईसीसीनं एक डेमोदेखील दाखवला.  

कोणतंही अंड फोडलं की, त्याच्या आत कवचाला चिकटलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो. अंड शिळं असल्यास हा पापुद्रा प्लास्टिकसारखा दिसतो. त्यामुळे आपल्याला ते अंड प्लास्टिकचं असल्याचं वाटतं, असं एनईसीसीनं सांगितलं. याबद्दल एनईसीसीकडून एक प्रात्यक्षिकदेखील दाखवण्यात आलं. 

प्लास्टिकसारखा दिसणारा अंड्याचा पापुद्रा आगीवर पकडल्यास तो सहजासहजी जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेतं. त्यामुळे प्लास्टिकचं अंड ही केवळ अफवा आहे. अंड्यांबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचा खुलासा केला.

प्लास्टिक अंड्यांच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसंच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मुंबई तसेच ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी ‘नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी’नं पुढाकार घेत प्लास्टिक अंड्यांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. 
 

Web Title: there is no plastic eggs national egg coordination committee proves with demo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.