देवनार डंपिंग ग्राऊंडसाठी सरकारकडे कोणतंच धोरण नाही - राहुल गांधी
By admin | Published: April 12, 2016 01:01 PM2016-04-12T13:01:04+5:302016-04-12T13:37:07+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवनार डंपिंग ग्राऊंडला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीच्या पार्श्वभुमीवर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १२ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मंगळवारी देवनार डंपिंग ग्राऊंडची पाहणी केली. देवनार डंपिंग ग्राऊंडला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीच्या पार्श्वभुमीवर भेट देऊन राहुल गांधींनी परिस्थितीची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी राज्य सरकार आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. 'स्वच्छ भारताबद्दल बोलणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, सरकारकडे कोणतंच धोरण दिसत नसल्यांचं', राहुल गांधी बोलले आहेत .
'देवनार डंपिंग ग्राऊंडचा अनेकांना त्रास होत आहे त्यामुळे ते येथून हलवण्यात यावं', अशी मागणीही राहुल गांधींनी यावेळी केली आहे. 'लहान मुलांना टीबीसारखे आजार होत आहेत, लोक आजारी पडत आहेत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचलण्याची गरज आहे मात्र परिस्थितीशी सामना करण्यासाठी कोणतंच धोरण नसल्याचं दिसत असल्याच', राहुल गांधी बोलले आहेत.
Cong vice president Rahul Gandhi visits Deonar dumping ground in Mumbai where a massive fire broke out last month pic.twitter.com/ORWvCk1IVS
— ANI (@ANI_news) April 12, 2016
This dumping ground is a cause of distress for many, should not be here: Rahul Gandhi at Deonar dumping ground pic.twitter.com/u8F3k4VChL
— ANI (@ANI_news) April 12, 2016