शिरपुरातील बँक दरोड्याच्या तपासात प्रगती नाही
By Admin | Published: December 22, 2016 03:55 AM2016-12-22T03:55:41+5:302016-12-22T03:55:41+5:30
येथील सेंट्रल बँकेत मंगळवारी दिवसाढवळ्या अधिकाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत १० लाखांची रोकड लांबविण्यात आली
शिरपूर (धुळे) : येथील सेंट्रल बँकेत मंगळवारी दिवसाढवळ्या अधिकाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत १० लाखांची रोकड लांबविण्यात आली, त्याचा पोलिसांना अजून कोणताही सुगावा लागलेला नाही.
पोलिसांच्या पथकाला पळासनेर व शिरपूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही दरोडेखोर आढळून आले नाहीत. बुधवारी बँकेत दिवसभर कॅश काउंटर बंद ठेवण्यात आले होते, परंतु ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बँकेलगतचे एटीएम सुरू होते.
बँकेचे अधिकारी मंगळवारी सायंकाळी अर्धवट शटर लावून प्रशासकीय काम करत होते. त्या वेळी चेहरा झाकून आलेल्या दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी अधिकाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत, १० लाख २६ हजार ५६५ रुपये लांबवले. (प्रतिनिधी)