माणदेशात अवकाळी पाऊस, साताऱ्यात घामाच्या धारा

By admin | Published: March 31, 2017 06:58 PM2017-03-31T18:58:37+5:302017-03-31T18:58:37+5:30

अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली

There is no rain in the country, sweat in Satara | माणदेशात अवकाळी पाऊस, साताऱ्यात घामाच्या धारा

माणदेशात अवकाळी पाऊस, साताऱ्यात घामाच्या धारा

Next

आॅनलाइन लोकमत
सातारा/खटाव, दि. 31 - सातारा शहरासह जिल्हा कडक उन्हामुळे तापलेला असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे खटावमधील ग्रामस्थ सुखावले.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या खटाव ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साठले होते.

दिवसभर उकाड्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना या पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला. तर उन्हाळ्यात पडलेला पाहिलाच पाऊस असल्याने लहान मुले व तरुणांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. खटाव तालुक्यातील वर्धनगडपासून पुसेगाव परिसरात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. बुधलाही ढगाळ वातावरण तयार होऊन अधूनमधून थेंब पडत होते. त्यामुळे पावसाची चिन्हे निर्माण झाली होती.

उर्वरित सातारा, फलटण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कऱ्हाड, जावळी, पाटण तालुक्यांमध्ये मात्र सलग चौथ्या दिवशीही सूर्य आग ओकत होता. सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी तीनच्या सुमारास काळे ढग जमा झाले होते. सातारा शहरात सलग दुसऱ्या दिवशीही दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. घरोघरी व शासकीय कार्यालयांमध्ये पंखे, वातानुकूलित यंत्रणा, कुलर यांचाच आधार घ्यावा लागत आहे.

अंभेरीत शेतात पाणी; ओढे, नाले तुडुंब

चौकीचा आंबा परिसरातील अंबेरी येथे सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी साठले होते. तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पळापळ झाली.

कांदा झाकण्यासाठी गडबड

खटाव परिसरात दुपारी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर शेतात काम करणाऱ्या मजुरांची एकच तारांबळ उडाली होती. कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने कांदा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड झाली.

Web Title: There is no rain in the country, sweat in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.