राज्यात वीजमीटरचा तुटवडा नाही; २ लाख ४१ हजारावर सींगल फेज मीटर उपलब्ध

By atul.jaiswal | Published: March 21, 2021 05:40 PM2021-03-21T17:40:05+5:302021-03-21T17:40:51+5:30

MSEDCL has lot of Single phase meter सध्या क्षेत्रीय कार्यालयांकडे सिंगल फेजचे २ लाख ४१ हजार मीटर उपलब्ध आहेत.

There is no shortage of electricity meters in the state; Single phase meter available at 2 lakh 41 thousand | राज्यात वीजमीटरचा तुटवडा नाही; २ लाख ४१ हजारावर सींगल फेज मीटर उपलब्ध

राज्यात वीजमीटरचा तुटवडा नाही; २ लाख ४१ हजारावर सींगल फेज मीटर उपलब्ध

Next
ठळक मुद्देमार्च अखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे.दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात.

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज तर १ लाख ७० हजार थ्रीफेज नवीन वीजमीटर पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये १ लाख ४४ हजार ९०४ वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध झाले असून, सध्या क्षेत्रीय कार्यालयांकडे सिंगल फेजचे २ लाख ४१ हजार मीटर उपलब्ध आहेत. मार्च अखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे.

महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव व ‘लॉकडाऊन’मुळे नवीन वीजमीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले वीजमीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत.

नवे १ लाख ४४ हजार मीटर प्राप्त

नव्याने प्राप्त झालेले १ लाख ४४ हजार ९०४ वीजमीटर सद्यस्थितीत महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयांना देण्यात आले आहेत. यापैकी पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे ३८ हजार ७०४, कोकण प्रादेशिक कार्यालयाकडे ६९ हजार ७००, नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे २० हजार तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे १६ हजार ५०० या प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

 

 

 

Web Title: There is no shortage of electricity meters in the state; Single phase meter available at 2 lakh 41 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.